ताज्या घडामोडीशिक्षण

राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेवर  प्राचार्य डॉ. अलका भिसे यांची नियुक्ती 


राष्ट्रीय मूल्यांकन व मानांकन परिषदेवर 

प्राचार्य डॉ. अलका भिसे यांची नियुक्ती 

अमरावती:प्रतिनिधी 

प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट संचलित वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अलका अनंतराव भिसे यांची राष्ट्रीय मानांकन व मूल्यांकन परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे.

देशातील उच्च शिक्षण संस्थांचे मूल्यांकन व मानांकन राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद / National Assessment and Accreditation Council या केंद्रीय स्वायत्त संस्थेद्वारे केले जाते.या संस्थेने नेमणूक केलेले peer team members उच्च शिक्षण संस्थांच्या Assessment and Accreditation करण्यासाठी भारतातील विविध महाविद्यालये व विद्यापीठांना प्रत्यक्ष भेटी देऊन मूल्यांकन करतात. या राष्ट्रीय परिषदेवर डाॅ.अलका

Advertisement

भिसे पूर्वाश्रमीच्या कु. जयश्री काशिनाथ दोरकर यांची निवड peer team member म्हणून झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित , प्रविण. खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालीत विनायक विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. त्या संगाबा अमरावती विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त पी.एच.डी. मार्गदर्शक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत ७ संशोधकांनी पी. एच.डी. पदवी प्राप्त केली आहे.त्या नंदुरबार येथील दै. उत्तर महाराष्ट्रचे संपादक योगेंद्र दोरकर यांच्या भगिनी आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *