सीबीआय आपल्या दारी ग्रामीण भागातील भ्रष्टाचार पीडितांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाने उचलले पाऊल
सीबीआय आपल्या दारी
ग्रामीण भागातील भ्रष्टाचार पीडितांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाने उचलले पाऊल
नाशिक प्रतिनिधी
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची शासकीय यंत्रणेकडून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्याने जनजागृती करण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाने ग्रामीण भागातील जनतेत विशेष मोहीम हाती घेतल्याची माहिती उपायुक्त रणजीत कुमार पांडे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप करताना दिली.
ग्रामीण भागात विशेषतः कृषी विभागामार्फत केंद्राच्या विविध योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. बेरोजगार युवकांसाठी मुद्रा कर्ज योजना, शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज योजना, विविध उद्योग प्रकल्प कर्ज यासारख्या विविध प्रकारच्या योजना राष्ट्रीयकृत बँकांमार्फत केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळविण्यासाठी अनेक ठिकाणी लाभार्थी बेरोजगार, शेतकरी यांच्याकडे पैशांची मागणी केली जाते. प्रकल्प रकमेवर ठरलेली टक्केवारी थेट किंवा दलालामार्फत मिळाल्याशिवाय योजनेच्या फायली मंजूर केल्या जात नाहीत. अशा स्वरूपातील भ्रष्टाचाराचा निपटारा करण्यासाठी केंद्रीय गुन्हा अन्वेशन विभागाने पीडित लाभार्थ्यांना तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्राशी संबंधित कुठल्याही विभागातील जसे पोस्ट खाते, रेल्वे, केंद्रीय जी एस टी, राष्ट्रीयकृत बँक यासारख्या संस्थामधून कुणीही अशा प्रकारची अडवणूक करीत असेल तर ८४३३७००००० किंवा ०२२-२६५४३७०० या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन सीबीआय उपायुक्तांनी केले आहे. यावेळी उपायुक्त रणजीतकुमार पांडे यांचेसोबत सीबीआयचे उप अधीक्षक सुधीर दांडा, पोलिस निरीक्षक गजानन देशमुख, पोलिस निरीक्षक स्वाती गवारे आदी अधिकारी उपस्थित होते.
भय बाळगू नका :
कायद्याचे अपूर्ण किंवा अर्धवट ज्ञान असणारा गरजवंत समाज अशाप्रकारच्या लाचखोरीची तक्रार करण्यास पुढे येत नाही. लाच देऊन आपले काम करून घेण्याकडे त्यांचा कल असतो. तक्रार केली तर आपले काम होणार नाही. योजनेचा फायदा मिळणार नाही अशी भीती लाभार्थ्यांच्या मनात असते, तथापी अशा प्रकरणामध्ये निकष पूर्ण करणारे प्रकरण तडीस नेऊन त्याचा लाभार्थ्याला लाभ मिळवून दिला जातो.
गाव मानोरी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक
या गावांमध्ये खूप सावकार झाले आहे पाच ते दहा टक्क्याने विना लायसन पैसे वाटतात.
गरीब लोक खूप त्रासले आहे
डिटेल्स पाठवा