सार्वत्रिक निवडणूक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सांगळे यांनी फुंकले रणशिंग… पत्रकार परिषद केले विविध तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
सार्वत्रिक निवडणूक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सांगळे यांनी फुंकले रणशिंग… पत्रकार परिषद केले विविध तालुक्यातील प्रश्नांवर चर्चा
सिन्नर प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात राजकीय घडामोडींना हळूहळू वेग आला आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशातच सह्याद्री युवा मंच संस्थापक अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य युवा नेते उदय सांगळे यांनी देखील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पत्रकार परिषदेत रणशिंग फुंकले आहे. मी 22 वर्षांपासून सामाजिक, राजकीय शैक्षणिक स्तरावर अनेक राबवले असून. जनसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी , विविध समस्यांना मार्गी लावण्यासाठी सिन्नर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित असून अशा विविध विषय घेऊन युवा नेते उदय सांगळे विधानसभेच्या मैदानात उतरणार असून यासाठी मी पुढील काळात आराखडा तयार केला आहे असे त्यांनी पत्रकार परिषदे दरम्यान सांगितले.
वारी सेवेची सिन्नरच्या विकासाची असे पत्रक छापले ..
सिन्नर हीच माझी ओळख तेच माझे कार्यक्षेत्र आहे देशाला हेवा वाटेल असे सिन्नर घडवणे स्वप्न माझ्या हृदयाचे आहे सोबतीला आपण सर्वजण आपली भक्कम अशी साथ आहे अशा आशयाचे तसेच सिन्नर तालुक्यातील नागरिकांना मी बावीस वर्ष सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात कोणकोणते कामे केले याची त्यांनी या पत्रकात विषय मांडल्या असून विधानसभा 2024 सार्वत्रिक निवडणूक लढवण्यास इच्छुक असून अशा आशयाचे पत्र त्यांनी छापले आहे.
पक्षाबद्दल अजून कोणताही विचार नाही
मी उमेदवार असून त्यासाठी सर्व तयारी केली आहे पुढे पक्षाचे कोणते चिन्ह असेल व कोणता पक्ष असेल याविषयी मी आता काहीच सांगू शकत नसून लोकांना आवडेल जो पक्ष व जो मला स्वीकारेल असा पक्ष असेल असे त्यांनी ठामपणे सांगितले व तालुक्यातील सत्ताधारी यांच्या बद्दल त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून रस्ते विकास कामे , यामधून विरोधकांवर आपल्या शैली भाषेत समाचार घेतला.