जामीनावर असूनही सावकारीचा सोस सुटेना ; जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची अखेर आत्महत्या
जामीनावर असूनही सावकारीचा सोस सुटेना ; जाचाला कंटाळून डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाची अखेर आत्महत्या
सिडको /विशेष प्रतिनिधी
इंदिरा नगर पोलिस ठाण्यात सावकारी प्रकरणी दाखल गुन्ह्यात जामीनावर बाहेर असतानाही व्याजाचा मोह सुटत नसल्याने वैभव देवरे नामक सावकारावर पुन्हा एकदा गुन्ह्याला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे. वैभव देवरे कडून सावकारी व्याज वसुलीच्या नावाखाली सुरु असलेला जाच असह्य झाल्याने अखेर ‘डीएसपी बासुंदी चहा’ फेम व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नांदुरी घाटाजवळील जंगलात १५ ऑक्टोबर रोजी त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्याजवळ सापडलेल्या आत्महत्येची कारणीभूत ठरणाऱ्या चिठ्ठीवरून या प्रकरणाचा उलगडा झाला..
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत धीरज पवार यांनी बेकायदेशीरपणे सावकारीचा धंदा करणा-या वैभव देवरे याच्याकडून एप्रिल २०२३ मध्ये १२ लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. सुरुवातीला व्यवस्थित हप्ते फेडले; मात्र नंतर काही आर्थिक अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. याचा गैरफायदा घेत वैभव देवरे आणि त्याच्या साथीदारांनी धीरज यांना धमक्या देणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार सुरू केले.
व्याजाने घेतलेली रक्कम न दिल्यास कळवण तालुक्यातील वडीलोपार्जित जमीन लिहून देण्याचा दबाव टाकला जात होता.
आणि याच वैभव देवरे याच्या जाचाला कंटाळून धीरज पवार याने आत्महत्या केली असुन वैभव देवरे याच्याकडून होणा-या जाच्याला कटांळुन मी आत्महत्या करत असल्याचे मयत धीरज याने मृत्युपुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती दरम्यान याबाबत मयत धीरजची पत्नी गीतांजली धीरज पवार यांनी पतीच्या मृत्युनंतर गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. वैभव देवरे, त्याची पत्नी सोनल देवरे आणि त्यांचा साथीदार निखील पवार असे तक्रारीत नावे आहेत.दरम्यान, वैभव देवरे विरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वीही बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता.त्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर असतानाही हा प्रकार घडल्याने व्याजाचा सोस किती होता हेच निष्पन्न होते.
सर्वसामान्यांच्या मागणीला व तक्रारीला न्याय देणार शासन प्रशासन दरबारी व्यथा मांडणारा एक वैशिष्ट्यपूर्ण नाव असलेलं दुनियादारी हे एक सामाजिक व्यासपीठ आहे, माननीय संपादक महोदय आपले मनापासून अभिनंदन…