चांदवड देवळा तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस ; नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा इशारा
चांदवड देवळा तालुक्यात ढग फुटी सदृश्य पाऊस ;नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा इशारा
नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातलाय, नाशिक जिल्ह्यातही ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून आधीच ओव्हर फ्लो झालेले बंधारे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सामावून घेऊ शकत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः देवळा आणि चांदवड तालुक्याला पावसाने जोरदार झोडपले.
नाशिक जिल्ह्यातल्या देवळा आणि चांदवड व दिंडोरी सुरगाणा तालुक्याला मोठ्या प्रमाणात तिचा पाऊस झाल्याने धरण फुटले असून त्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे. विहिरी वाहून गेल्या तर धरण फुटल्याने ट्रॅक्टर सुद्धा पाण्यात वाहून गेला.
एवढेच नाही तर नाशिकसह आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे . बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्यामुळे आता पावसाचा गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आले आहे..
Advertisement
चांदवड शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्याने अनेक व्यवसाय दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्ये अवधूत पेस्ट साईट यांच्या दुकानात कमरे एवढं पाणी शिरल्यामुळे सर्व शेतीसाठी उपयुक्त औषधे पूर्णत, पाण्यात भिजून गेली.
या अवधूत पेस्ट टीमचे संचालक अभिजीत शेंडगे यांनी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती पत्रकारांना दिली आहे. काल रात्री चांदवड शहरात व तालुक्यात ढगफुटी झाल्याने अतोनात नुकसान झाले आहे. चांदवड शहरांमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्यामध्ये गाड्या बुडाल्या. दुकानांमध्ये पाणी घुसले. जन जीवन विस्कळीत झाले होते. चांदवड ग्रामिण भागातही पावसाचा तडाका पाहायला मिळाला विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडीने तचांदवड तालुक्याच्या परिसर दणाणून सोडला.
चांदवड पासून काही अंतरावर असलेल्या आहेर वस्ती येथील धरण फुटल्यानंतर त्याचं पाणी जे आहे ते प्रचंड प्रमाणात असल्यामुळे ट्रॅक्टर, विहीर, शेततळे वाहुन गेले.
यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले ती परिस्थिती पाहिल्यानंतर खरोखर पाऊस कशा पद्धतीने पडतो हे लक्षात आलं.आज नाशिक जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस जोडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे.