क्राईम

शरद पवार राष्ट्रवादीच्या तालुका कार्या अध्यक्षपदी जयराम शिंदे ; शरद पवार निष्ठेचे मिळाले फळ 


शरद पवार राष्ट्रवादीच्या तालुका कार्या अध्यक्षपदी जयराम शिंदे

शरद पवार निष्ठेचे मिळाले फळ 

रश्मी मारवाडी /सिन्नर

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सिन्नर तालुका कार्याध्यक्ष पदी ठाणगाव येथील युवानेते आणि सामाजिक कार्यकर्ते,डॉ समर्थ सावलीचे संस्थापक जयराम शिंदे यांची निवड करण्यात आली . जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

Advertisement

जयराम शिंदे गेली अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सक्रिय असून शरद पवार यांचे कडवे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. यापुढेही पक्षासाठी सदैव तत्पर राहू, खासकरून शेतकरी वर्ग गरजू लोकांसाठी सतत काम करत राहणार अशी ग्वाही जयराम शिंदे यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सचिव राजाराम मुरकुटे, शहराध्यक्ष नामदेव कोतवाल, युवक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, प्रदेश युवक सरचिटणीस दिनेश धात्रक, सिन्नर युवक तालुकाध्यक्ष संदीप शेळके, प्रशांत काकड, निकेश आव्हाड, रोहित काकड आदी उपस्थित होते.

ज्येष्ठ नेते कृष्णाजी भगत, सिन्नर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संजय सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते ऐ. टी. शिंदे, आदिनाथ शिंदे, माजी उपसभापती सोमनाथ भिसे, प्रा. आर. के. मुंगसे, दत्ता गोळेसर , महिला तालुकाध्यक्ष डॉ. प्रतिभाताई गारे, महिला शहराध्यक्ष मंगलताई गोसावी आदींनी निवडीचे स्वागत केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *