मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांची तब्येत खालावली;उपोषणाला ५६ तास उलटले
मनोज जंरागे पाटीलांची तब्येत खालावली:
उपोषण सुरू होऊन ५६ तास उलटले; शासनाने तात्काळ दखल घ्यावी
्आज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू होऊन चार दिवस उलटले,५६ तास उलटले त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, पोटात पाण्याचा एक थेंब व अन्नाचा कणही नसल्याने समाज योद्धा जरांगे पाटील प्रकुत्ती खालावत चालली आहे, संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष जंरागे पाटीलच्या उपोषणाकडे लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून जंरागे पाटील यांच्याशी संवाद साधावा असे आवाहन मराठा समाजा कडुन करण्यात येत आहे.
उपोषण कशासाठी?
कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट कधी देणार? सगे सोयरे यांच्या बाबतीत अधिक स्पष्टता शासनाकडुन तात्काळ जाहीर करण्यात यावी, मराठ्यांशी दगा फटका करू नका, मराठ्यांना विनाविलंब कुठलीही कायदेशीर अडचण न येता निर्विवाद पणे मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळावे म्हणून येत्या१६ तारखेपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे.ज्यामध्ये ‘सगे-सोयरे’ जीआर बद्दल चर्चा होऊन कायद्यात रूपांतर होणे अपेक्षित आहे.यासाठी सर्व समाज बांधवांनी आपापल्या स्थानिक आमदारांना फोन करून, प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन ‘सगे-सोयरे’ जीआर समाजासाठी किती महत्त्वाचा आहे ते पटवून सांगितले पाहिजे.
सर्व पक्षीय आमदारांनी विधिमंडळात जीआरच्या बाजूने स्पष्ट भूमिका घ्यावी. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे. अशी ठाम भूमिका घेवून मराठां समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा पारित करावा असे आवाहन मराठा समाजा कडुन करण्यात येत आहे,
ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या परिवाराला व सग्या-सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणे क्रमप्राप्त आहे.
राज्यातील मराठा समाज अधिवेशनातील घडामोडींकडे बारकाईने लक्ष देणार आहेत. आमदार काय भूमिका घेतात ? त्यावरच त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.प्रत्येक मतदारसंघातील मराठा बांधवांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना या अधिवेशनात मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यासाठी दबाव आणावा असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी समाज बांधवांना केले आहे.