क्राईम

 रवींद्र आप्पा टिळे यांची नाशिक जिल्हा दिव्यांग संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड


रवींद्र आप्पा टिळे यांची नाशिक जिल्हा

दिव्यांग संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड

रश्मी मारवाडी :सिन्नर  / आपली दुनियादारी

रवींद्र आप्पा टिळे यांची नाशिक जिल्हा दिव्यांग संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. नामदार बच्चू कडू यांचे आदेशाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिव्यांग बापूसाहेब काने व महासचिव रामदास खोत यांनी नुकतीच त्याच्या नावाची घोषणा करून नियुक्ती पत्र प्रदान केले.

Advertisement

नाशिक व सिन्नरसह इतर तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरल्याने  दिव्यांगांना न्याय देणारा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या निवडीने सार्थ ठरवली.  तालुक्यातूनच नव्हे तर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून समाज माध्यम, दूरध्वनी, भ्रमणध्वनी, फेसबुक आदी माध्यमातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तर अनेकांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. नाशिक जिल्हा जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद संपत शिंदे,उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, सिन्नर तालुका अध्यक्ष कैलास दातीर,दिव्यांग तालुकाध्यक्ष भाऊसाहेब सांगळे, महिला तालुकाध्यक्ष वैशाली अनवत, कार्याध्यक्ष संदीप आव्हाड, ओबीसी अध्यक्ष प्रहार ज्ञानेश्वर काकड,कार्याध्यक्ष एडवोकेट विलास खैरनार, प्रभारी कांचन भालेराव,संपर्कप्रमुख सुनील जगताप,जिल्हा उपाध्यक्ष कमलाकर शेलार, जिल्हा कामगार अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली ढोली, उपाध्यक्ष पुष्पा भोसले,शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे, तक्रार निवारण तालुका अध्यक्ष गणेश मस्के,संघटक प्रकाश थोरात, संपर्कप्रमुख सुनील जगताप, कपिल कोठुरकर,शेतकरी अध्यक्ष चंद्रकांत डावरे,अल्पसंख्याक अध्यक्ष रज्जाक भाई सय्यद,कार्याध्यक्ष आशाताई गोसावी,आदिवासी अध्यक्ष रत्नाताई पवार,सिन्नर युवा तालुका अध्यक्ष संदीप शिरसाट, सिन्नर तालुका मीडिया तालुकाध्यक्ष पवार आदींनी या निवडीवर समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्यात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *