क्राईम

दोन गावठी कट्ट्यांसह तीन आरोपी उपनगर पोलिसांनी केले जेरबंद , उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांची कामगिरी


दोन गावठी कट्ट्यांसह तीन आरोपी उपनगर पोलिसांनी केले जेरबंद

 

उपनगर पोलीस ठाण्याचे सोमनाथ गुंड यांची कामगिरी

 

आपली दुनियादारी /नाशिक

 

उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इच्छामणी लॉन्स जवळील मोकळ्या जागे जवळ एक संशयित गावठी कट्ट्यासह येणार असल्याची माहिती उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सोमनाथ गुंड यांना गुप्त बातमीदाराने सांगितली. याबाबत त्यांनी तत्काळ वरिष्ठांना सुचित केले आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या सहाय्याने संशयीताला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसह ताब्यात घेतले. गुन्हे शोध पथकाने त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांची नावे सांगितले. त्यांच्याकडे देखील एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस असल्याची कबुली त्याने देताच उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने दोघा संशयितांना एक कट्टा व दोन जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. शुभम अशोक जाधव वय २३ वर्षे, रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक, सचिन धर्मा सोनवणे वय २४ वर्षे, रा. सोनवणे बाबा चौक, समतानगर, उपनगर नाशिक, गणेश जगदीश भालेराव उर्फ बॉबी वय २४ वर्षे, रा. सिध्दार्थ किराणा जवळ, समतानगर, नाशिक अशा प्रकारे या तीन संशयीतांकडून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतूस जप्त करण्यात उपनगर पोलिसांना यश आले आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे शहर आयुक्त संदीप कर्णिक तसेच परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी नव्यानेच पदभार स्वीकारणारे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब डुकळे, गून्हेशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस अंमलदार लखन विनोद, इम्रान शेख, जयंत शिंदे, अनिल शिंदे, सोमनाथ गुंड, सुरज गवळी, राहुल जगताप, पंकज करपे, सौरभ लोंढे, संदेश रगतवान, यांचे कौतुक केले असून अशा प्रकारे चांगल्या कारवाईची सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisement

 

नाशिक शहर आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाण्याची हद्द अतिसंवेदनशील समजली जाते, ती येथे घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांमुळे. या हद्दीतच कोयता गॅंगचा जन्म झाला आणि बघता बघता संपूर्ण नाशिकरोड परिसर या गॅंगची दहशत सहन करत होता, माध्यमांच्या प्रतिनिधींनी याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध करून पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त करत या गुन्हेगारीतून मुक्तता होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला होता. मागील काळामध्ये याची दखल घेत पोलिसांनी जोरदार कारवाई करत कोयता गॅंग व त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करून तुरुंगात डांबले.शरीराविरुद्धचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने उपनगर पोलिसांनी चौकाचौकातून आणि हद्दीतून गुन्हेगारांची वरात काढली आणि कठोर पावलं उचलत गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यास सुरुवात करण्यात आली.

 

*एक संधी पुन्हा मिळायलाच हवी!*

  1. शहर पोलीस दलातल्या काही कर्मचाऱ्यांच्या नसानसात डिटेक्शनची आवड असणाऱ्यांपैकीच एक उपनगर पोलीस ठाण्यात सध्या जनरल ड्युटी करणारा पोलीस अंमलदार सोमनाथ गुंड तसा तर हा व्यक्ती पैलवान परंतु यासोबतच नेटवर्क किंग म्हणून देखील हा व्यक्ती आयुक्तालयात प्रसिद्ध आहे. डिटेक्शनची आवड या व्यक्तीमध्ये इतकी आहे की त्यांनी स्वतःच एक खबऱ्यांचं नेटवर्क तयार केलं आहे. ज्यामुळे बऱ्याचशा उघडकीस न आलेल्या व क्लिष्ट गुन्ह्यातील तपासात सक्रिय सहभाग घेतल्यानंतर खबऱ्यांच्या माध्यमातून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. खरंतर अशा व्यक्तीला पुन्हा एकदा गुन्हे शोध पथकाची जबाबदारी देण्यास काही हरकत नाही. आधीच कर्मचारी कमतरतेमुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत असतानाच उपनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात दिवस आणि रात्रीच्या पथकात तीन आणि चार इतकेच कर्मचारी असल्याने हद्दीची संवेदनशीलता लक्षात घेता तसेच गुन्हेगारांची चांगली ओळख व डिटेक्शन ऑपरंडीचा दीर्घ अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एक संधी मिळायलाच हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *