क्राईम

कंबाईन:नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा वाव ; उत्पादन गुणवत्ता वाढीसाठी गोदरेज ऍग्रोव्हेट प्रयत्नशील 


कंबाईन:नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला मोठा वाव ;

 

उत्पादन गुणवत्ता वाढीसाठी गोदरेज ऍग्रोव्हेट प्रयत्नशील 

 

 

नाशिक प्रतिनिधी

 

महाराष्ट्रातील द्राक्ष शेतीत नाशिक जिल्हा अग्रेसर असून तब्बल पन्नास टक्के क्षेत्र नाशिक जिल्ह्यात आहे.इतकेच नाही तर देशातून साडे तीन लाख मे. टन द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा निम्मा म्हणजे जवळपास दीड लाख मे. टन एव्हढा आहे. ही आकडेवारी मोठी दिसत असली तरी एकूण द्राक्ष उत्पादनाचा विचार करता केवळ दहा ते पंधरा टक्के इतकेच द्राक्ष उत्पादन निर्यात केले जात आहे. आपला शेतकरी निर्यात क्षम द्राक्ष पिकविण्यात अयशस्वी होत असल्यानेच ही परिस्थिती असून यात आमुलाग्र बदल करता येऊ शकतो, असा आशावाद गोदरेज ऍग्रोवेट या कंपनीने निर्माण केला आहे.

गोदरेज ऍग्रोव्हेट ही कंपनी गेल्या २५ वर्षांपासून अन्य नगदी पिकांसोबत द्राक्षाचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा, खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसून शेतकऱ्यांना अधिक फायदा व्हावा यासाठी विविध प्रयोग करीत आहे. याच प्रयोगशिलतेतून गोदरेज ऍग्रोव्हेट ही कंपनी देशाच्या विविध भागात द्राक्ष लागवड अनुकूल होऊन अधिकाधिक क्षेत्र द्राक्ष लागवडीखाली यावे, त्यातही निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन वाढवे यासाठी शेतीतील विविध तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता कंपनीच्या वतीने द्राक्षाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी द्राक्ष पीक पॅकेज सादर केले आहे. यात द्राक्ष उत्पादकांना लागवडी दरम्यान प्रत्येक टप्प्यावरील आवश्यक बाबींची माहिती पुरविण्याची सक्षम यंत्रणा कंपनीने उपलब्ध केली आहे. द्राक्ष वेलीच्या छाटणीपासून ते मण्यांच्या विकासापर्यंत अत्याधुनिक बायोस्टुमिलन्ट्स आणि पी . जी. आर.चे वेळापत्रक या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे.

 

गोदरेज ऍग्रोव्हेट लिमिटेडच्या कंबाईन या उत्पादनामुळे द्राक्षाची लागवड करणाऱ्या जवळपास १ लाख शेतकरी कुटुंबांना द्राक्ष शेतीत दरवर्षी फायदा झाल्याचा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. या कुटुंबांकडून दरवर्षी देशाच्या ७५ टक्के म्हणजे २. २५ लाख एकर जमिनीवर द्राक्ष पिकवली जातात.

Advertisement

 

 

“गोदरेज कंबाईनमुळे द्राक्षाची गुणवत्ता वाढविण्यासाठी मदत झाली आहे.कंबाईन मध्ये द्राक्ष लागवडीसाठी आवश्यक एच बी आर म्हणजे होमोब्रासिनोलाईड या घटकाचे योग्य प्रमाण उपलब्ध करून देण्यात आले आहे. अन्य कंपन्याच्या या उत्पादनात बऱ्याचदा होमोब्रासिनोलाईड या घटकाचा वापर केला जात नाही. काही उत्पादनात अत्यल्प प्रमाणात वापरले जाते. अशा उत्पादनांचा द्राक्ष शेतीला फारसा उपयोग होत नाही. द्राक्षाचे वेगवेगळ्या कीड व रोगांपासून संरक्षण व्हावे आणि निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन आणि गुणवत्ता उत्तम व्हावी, म्हणून गोदरेज ऍग्रोव्हेट द्राक्ष पीक पॅकेज सादर करत आहे. ”

 

-एन. के. राजवेलू

मुख्य कार्यकारी अधिकारी

क्रॉप प्रोटेक्शन बिझिनेस

गोदरेज ऍग्रोव्हेट लि.

 

 

 

” देशातील द्राक्ष शेती अधिक समृद्ध व्हावी म्हणून आम्ही तयार केलेले द्राक्ष पीक पॅकेज सर्वोत्तम असेल. नाशिकच्या द्राक्षांना युरोपातील बाजारात प्रचंड मागणी आहे. पॅकेज मधील उत्पादनांचा योग्य वापर झाल्यास द्राक्षाचा आकार, चव, रंग आणि टिकाऊपणा उत्तम राखण्यास मदत होईल. त्याचबरोबर युरोपसारख्या इतर देशात द्राक्षांची निर्यातही वाढेल.”

– डॉ. संचित मंडपे

 

कसे वापराल गोदरेजचे बायोस्टिम्युलंट्स:-

जगातील वेगवान बायोस्टिम्युलंट्स म्हणून ओळखले जाणारे टेरा सोर्ब २ मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून वापरल्यास झाडावर एकसारख्या प्रमाणात घड येतात. पानांचा हिरवेगारपणा टिकतो. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमी भरून निघते. द्राक्षांच्या छाटणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी झाडांना आर्मुरॉक्स फवारले जाते. आर्मुरॉक्सच्या वापराने झाडांवर संरक्षणात्मक सिलिकॉन क्यू्टिकल्स तयार होते. आणि या क्यू्टिकल्समुळे कीटकनाशकांचा वापरही कमी होतो. तसेच थ्रीप्स आणि भुरी रोगापासून होणारे नुकसान कमी होते. द्राक्षाच्या विकासादरम्यान फळाची गुणवत्ता, आकार, लांबी, चव आणि रंग अबाधित राहावा म्हणून सुपर शक्ती किंवा डायमोर आणि इक्विलिब्रियम ही दोन उत्पादने एकमेकात मिसळून द्राक्षावर फवारले जातात. ३ ते ५ मिमी द्राक्ष मण्याच्या अवस्थेमध्ये हिरव्या आणि गोल द्राक्षासाठी डायमोर (१ मिली /लिटर )आणि लांब आणि रंगीत द्राक्षासाठी सुपर सुपर शक्ती (१ मिली /लिटर )वापरावे. यामुळे द्राक्ष मण्यांची वाढ आणि योग्य आकार मिळण्यास मदत होते. ६ ते ८ मिमी द्राक्ष मण्याच्या अवस्थेमध्ये सर्व प्रकारच्या द्राक्षांसाठी २ मिली प्रती लिटर पाण्यात सुपरशक्ती आणि इक्विलिब्रियम मिसळून पुन्हा फवारावे. यामुळे द्राक्षाचा आकार आणि टिकाऊपणा वाढवण्यात मदत होईल. कंबाईनच्या योग्य वापराने नाशिकमधील द्राक्ष निर्यात, सांगलीतील द्राक्षांची गोडी आणि कर्नाटकातील मनुक्यांची गुणवत्ता वाढल्याचे दिसून आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *