क्राईम

नाशिक जिल्ह्याला महायु्तीकडून दमदार रिटर्न गिफ्टची अपेक्षा ; वजनदार खाती पदरात टाकून विकासाला गती द्या 


नाशिक जिल्ह्याला महायु्तीकडून दमदार रिटर्न गिफ्टची अपेक्षा ;

 

वजनदार खाती पदरात टाकून विकासाला गती द्या 

 

 

 

प्रशांत हिरे / सुरगाणा

Advertisement

 

नाशिक जिल्ह्याने यंदा महायुतीवर भरभरुन ‘मतप्रेम’ व्यक्त केले. त्याबदल्यात महायुती सरकारने नाशिक जिल्ह्याला तिन कॅबिनेट मंत्रिपदे देवून ‘लाडके’ बनवले. आता वजनदार खाती देवून नाशिक जिल्ह्यांचा दमदार विकास करावा, अशीच अपेक्षा नाशिककरांनी आहे. विधानसभा निवडणुकीत बहुचर्चित मंत्रिमंडळाचा विस्तार अखेरीस रविवार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यास मंत्रिपद मिळाले. जिल्ह्यातील १५ पैकी १४ विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयी करत जिल्हावासीयांनी महायुतीच्या पदरात भरभरुन ‘मताचे दान’ टाकले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी जिल्ह्यातील तिघांनीही वजनदार खाती देवून जिल्ह्याच्या दमदार विकासात मोलाची भूमिका बजवावी, अशी आशा लागून राहिली आहे. तसेच जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली नाही आहेत. त्यामुळे आता वजनदार पालकमंत्र्याची जिल्ह्याला गरज देखील आहे. देशात आलेल्या विदेशी गुंतवणूकीपैकी ५० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. त्यातील काही गुंतवणूक नाशिक जिल्ह्यात वळवून या जिल्ह्यातील लोकांना रोजगारासाठी संधी प्राप्त व्हावी यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात यावे अशी देखील मागणी केली जात आहे. अनेक तरुण उच्चशिक्षित असूनही आपल्या जिल्ह्यात अपेक्षित नोकरी मिळत नसल्याने अनेकांनी पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये स्थलांतर केल्याची देखील वस्तुस्थिती आहे. कौशल्य असून देखील तरुणाला स्वतः च्या शहरात नोकरी मिळत नाही हे दुर्भाग्य म्हणावे लागेल. आपल्या जिल्ह्यातील तरुणाचा दुसर्या शहराला फायदा होत आहे. त्यामुळे जिल्ह्याला वजनदार खाते मिळण्याची देखील गरज आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *