माँ मातंगी दिव्या धामचे पिठाधीश श्री श्री प्रेमासाई यांची विशेष उपस्थिती; छावा क्रांतिवीर सेनेचा अकरावा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न होणार – करण गायकर
माँ मातंगी दिव्या धामचे पिठाधीश श्री श्री प्रेमासाई यांची विशेष उपस्थिती;
छावा क्रांतिवीर सेनेचा अकरावा वर्धापन दिन नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न होणार – करण गायकर
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………………
नाशिक प्रतिनिधी
नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी छावा क्रांतीवीर सेनेचा ११ वा वर्धापन दिन राज्यभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होत आहे. राज्यभरातून छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी नाशिकमध्ये वर्धापन दिनासाठी येणार असून, वर्धापनदिनी विविध प्रश्नांवर चर्चा व मंथन करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायं. ६ वा.संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कामगार नेते आणि जेष्ठ पत्रकार अभिजित राणे यांच्या हस्ते या सोहळ्याचे उदघाटन होणार आहे. निवृत्त आय पी एस बी. जी. शेखर हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी छत्तीसगड येथील माँ मातंगी दिव्या धामचे पिठाधीश श्री श्री प्रेमासाई यांची विशेष उपस्थितीत लाभली आहे.
याखेरीज विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय,नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,नाशिक पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विक्रम देशमाने,शिवसेना उपनेते धर्मवीर सुनील भाऊ बागुल,माजी महापौर दशरथ पाटील,भाजप प्रवक्ते अजित चव्हाण,शिवसेना (शिंदे गट) उपनेते अजय बोरस्ते,शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर,राष्ट्रीय जनस्वराज्य सेनेचे संस्थापक सुरेश पवार,शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष गजानन शेला आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
वर्धापन दिनी छावा क्रांतीवीर सेनेचा संकल्प:-
1. मराठा समाजाला ओबीसीतून ५०% च्या आत सरसकट आरक्षण.
2. मराठा मुलामुलींसाठी महाराष्ट्रात अद्ययावत वस्तीगृहे सुरू करणे.
Advertisement3. अवकाळी पिकविमा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत.
4. दुधाचे दर निश्चित करून गायी व म्हशीच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर अनुदान.
5. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वीज व पाणी बिल माफ.
6. शेतीमालाला हमीभाव व गड-किल्ल्यांचे संवर्धन व जतन.
7. कामगार कायद्याची सक्तीची अंमलबजावणी व बाहेर जाणाऱ्या उद्योगधंद्यांना महाराष्ट्रात चालना देणे.
8. महिला सक्षमीकरणासाठी कडक कायदे व त्याची अंमलबजावणी.
9. मराठी शाळांचा दर्जा सुधारून अद्ययावत डिजिटल शाळा बनवणे.
10. आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयांची स्थिती सुधारण्यासाठी मंत्रालय कक्ष निर्मिती.
या सर्व मुद्द्यांवर सखोल चिंतन मंथन होऊन,पुढील वर्षभर संघटनेच्या वतीने अधिक आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली वर्धापन दिनाच्या सोहळ्याची तयारी करण्यासाठी मुंबई नाका येथील छावा क्रांतिवीर सेना संपर्क कार्यालयात महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.या बैठकीत, १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता,कालिदास कला मंदिर, गंजमाळ,नाशिक येथे छावा क्रांतिवीर सेनेचा अकरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विविध समित्या स्थापन करून, अनेक पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या.
वैशिष्ट्ये :-सर्व नवनिर्वाचित आमदार आणि वर्षभर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दैनिक वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधींचा गौरव सोहळा,छत्रपती संभाजी नगर येथील विख्यात शाहीर सुरेश जाधव यांचा शाहिरी पोवाडा.हे या वर्धापन दिनाचे वैशिष्ट्य आहे.
या बैठकीसाठी संस्थापक अध्यक्ष करण गायकर,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहूळे,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश पाटील,विद्यार्थी आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख अविनाश गायकर,वाहतूक आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख अमोल देवरे,युवा आघाडी शहर संपर्कप्रमुख शुभम महाले,युवक शहराध्यक्ष नामदेव शिंदे,दत्ता पवार,कणसे बाबा,आदींची प्रमुख उपस्थिती होती.