क्राईमताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४१ टक्के संपत्ती जमा केल्याप्रकरणी निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा 


कायदेशीर उत्पन्नापेक्षा ४१ टक्के संपत्ती जमा केल्याप्रकरणी निवृत्त मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा 

 

 

नाशिक प्रतिनिधी 

नाशिक महापालिकेचे निवृत्त मुख्य अधिकारी अनिल चुडामान महाजन यांनी अग्निशमन महानगर पालिका येथे कार्यरत असतांना दिनांक २२/१०/१९८६ ते दिनांक ३१/०५/२०१८ दरम्यान सेवा कालावधीत कायदेशीर उत्पन्ना पेक्षा ४२ टक्के अधिक म्हणजे १,३१,४२,८६९/- (एक कोटी एकतीस लाख बेचाळीस हजार आठशे एकोणसत्तर रुपये ) एवढी अपसंपदा केल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झाल्याने, तसेच सदर अपसंपदा संपादित करणे कामी निशा अनिल महाजन यांनी प्रोत्साहन दिले म्हणून त्यांचे विरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे सन २०१८ सुधारणा पूर्वीचे कलम १३(१)(इ) व १२ प्रमाणे गुरुवारी पावणे पाच वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच लुचपत विरोधी विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी उप अधीक्षक अनिल बडगुजर यांनी तपास करून पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी हा गुन्हा दाखल केला.

Advertisement

 

कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास

अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक, दुरध्वनी क्रं. 0253 2578230

,टोल फ्री 1064 येथे संपर्क करावा असे आवाहन एसीबीने केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *