इंदिरा नगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, परिसरात हळहळ, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
इंदिरा नगर परिसरात एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या,
परिसरात हळहळ, आत्महत्येचे कारण अस्पष्ट
नाशिक प्रतिनिधी
इंदिरानगर भागात वडाळा पाथर्डी रोडवरील सराफ नगर येथील एका घरात तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे आत्महत्या का केली याचं निश्चित कारण पुढे आले नाही. शेजारी राहणाऱ्या नागरिक यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले आहे. आई,वडील आणि मुलगी अशा तीन जणांनी आत्महत्या केली, याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. मयत हे कंपनी कामगार होते. विजय माणिकराव सहाणे(वय ४०) त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी विजय सहाने (वय ३६)आणि मुलगी अनन्या विजय सहाने असे आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.