क्राईम

सिडको गोळीबार प्रकरणी आरोप प्रत्यारोप ; ऍड आहेर यांचे ऍड जाधव यांच्यावर गंभीर आरोप, ऍड जाधव यांनीही दिले प्रतिउत्तर


सिडको गोळीबार प्रकरणी आरोप प्रत्यारोप ;

 

ऍड आहेर यांचे ऍड जाधव यांच्यावर गंभीर आरोप,

ऍड जाधव यांनीही दिले प्रतिउत्तर

 

नाशिक प्रतिनिधी

सन 2022 मध्ये सिडकोत झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले असून उभय पक्षांकडून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. संशयितांना पोलिस कोठडीत मारहाण झाल्याचा आरोप झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाचे शासकीय रुग्णालय, पूर्वीचे जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले तेंव्हा एका संशयिताच्या नातेवाईक महिलेसोबत फिर्यादी पक्षाने बेकायदेशीर वर्तन केल्याचा आरोप त्या महिलेचे वकील ऍड मनोज आहेर यांनी पत्रकार परिषदेत केला.ऍड आहेर हा एकच आरोप करून थांबले नाहीत तर गोळीबाराच्या वेदना सोसलेले ऍड प्रशांत जाधव यांचे बीफ व्यापाऱ्यांशी संबंध आहेत. सन 2019 मध्ये देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात जाधव यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात ते 15 दिवस मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्यासोबत एका वेगळ्या गुन्ह्यात असलेला एक आरोपी ज्याला सन 2022 च्या गोळीबाराचाही संशय आहे, तो होता. मग जाधव यांनी त्याला गोळीबार झाला त्यावेळी का ओळखले नाही.असा सवाल ऍड आहेर यांनी उपस्थित केला. याखेरीज ऍड आहेर यांनी फिर्यादी जाधव आणि पोलिसांची मिलीभगत असून त्यांना हाताशी धरून गोळीबारातील संशयितांना पोलिस कोठडीत मारहाण करून घेतली. त्या संबंधाच्या पुराव्यादाखल ऍड आहेर यांनी काही छायाचित्र पत्रकार परिषदेत सादर केली.

Advertisement

 

ऍड जाधव यांनी आरोप फेटाळले :

ऍड मनोज आहेर यांनी केलेल्या गंभीर आरोपांना ऍड प्रशांत जाधव यांनी सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे. ऍड जाधव यांच्याशी संपर्क साधून या आरोपांविषयीं छेडले असता,गुन्ह्या पश्चात झालेली उपरती असे सांगत हे सर्व आरोप धादान्त खोटे असल्याचे स्पष्ट केले. देवळाली कॅम्प मध्ये दाखल गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला असून माहिती न घेता आहेर यांनी बदनामी तर केलीच शिवाय न्यायालयाचाही अवमान केल्याचा प्रती आरोप केला. खासगी आयुष्यात पोलिस, आणि सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांचे संबंध असू शकतात असेही जाधव म्हणाले.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *