खाकीतील सामाजिक बांधिलकीने वाचवले उध्वस्त होणारे दोन आयुष्य; फौजदार सुजित पाटील यांनी उंचावली पोलिस खात्याची मान
खाकीतील सामाजिक बांधिलकीने वाचवले उध्वस्त होणारे दोन आयुष्य;
फौजदार सुजित पाटील यांनी उंचावली पोलिस खात्याची मान
बोधवड प्रतिनिधी
कायदा सुव्यवस्था राखणं हे खाकीचं म्हणजेच पोलिस यंत्रणेचे पहिलं काम. या कामासोबत आपोआप जोडली गेलेली सामाजिक बांधिलकी आणि त्यातून पाझरणारी माणुसकी प्रसंगावधान राखून कृतीत उतरली तर खाकी वर्दीचा शिपाई आपल्या कर्तव्याला खरा न्याय देऊ शकतो याचे प्रत्यंतर २० ऑक्टोबरच्या भल्या सकाळी बोदवडकरांना आले. दि.२०/१०/२०२४ रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास बोदवड पोलीस स्टेशन हद्दीत पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील हे मॉर्निंग वॉक करत असतानाही कर्तव्याचा भाग म्हणून बोदवड बस स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने नजर टाकावी म्हणून फेरफटका मारण्यासाठी गेले.त्यावेळी बस स्थानक प्लॅटफॉर्मवरून त्यांची भेदक पोलिसी नजर फिरत असताना दोन मुली तोंडाला स्कार्फ बांधून बसलेल्या त्यांना दिसल्या.त्या गर्दीतही पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या चाणाक्ष पोलिसी नजरेने ह्या मुली, काहीतरी संशय निर्माण करणाऱ्या आहेत हे ओळखले. सुजित पाटील यांनी सदर मुलींना विचारपूस केली असता सदर मुली जामनेर तालुक्यातील बेटावड बु// येथील असल्याची माहिती समोर आली. सुजित पाटील यांनी मुलींना विश्वासात घेऊन अधिक माहिती विचारली असता,मुली पालकांना न सांगता घरातून पळून आल्या होत्या. भुसावळपासून दूर जाण्याच्या तयारीत होत्या. सुजित पाटील यांनी तत्काळ सदर प्रकार पोलिस निरीक्षक भोळे यांना सांगितला.पोलिस उपनिरीक्षक सुजित पाटील यांनी सदर मुलींच्या पालकासोबत संपर्क साधून,मुलींना सुखरूप पालकांच्या ताब्यात दिले. सदर प्रकरणातून बोदवड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने एका पोलिस उपनिरीक्षकाचे काम केले तर त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीने समाजाप्रती नैतिक जबाबदारी पाडली. मॉर्निंग वॉकसाठी निघालेले सुजित पाटील एरवी थेट घरी जाऊ शकले असते, मात्र त्यांच्यातील पोलिस जागा होता म्हणून त्यांनी कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी दोन्ही जपत दोन जिजाऊंच्या लेकींचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचवले.म्हणूनच पंचक्रोशीत पोलिस निरीक्षक भोळे व उपनिरीक्षक सुजित पाटील, बोदवड पोलिस स्टेशनचे महिला पोलिस रूपाली डांगे , पोलीस हवालदार मोनी पाटील पोलीस हवालदार आयुब तडवी,पोलीस हवालदार संतोष चौधरी,पोलीस नाईक युनूस तडवी, पोलीस शिपाई माधव गोरेवार , विजय पाटील , प्रदीप चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.