नाशिकच्या तीनही जागांसह उत्तर महाराष्ट्रात भाजपच जेता :मंत्री गिरीश महाजन दोन दिवसात बंडोबा शांत होतील
नाशिकच्या तीनही जागांसह उत्तर महाराष्ट्रात भाजपच जेता :मंत्री गिरीश महाजन
दोन दिवसात बंडोबा शांत होतील

नाशिक प्रतिनिधी
महाराष्ट्रात महायुतीला पोषक वातावरण असून त्यातही उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून राज्यात नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त जागा निवडून येतील, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथे व्यक्त केला.
Advertisement
माघारीच्या आदल्या दिवशी नाशिकमधील तीनही मतदार संघाचा आढावा घेऊन निवडणुकीच्या संदर्भात ते पत्रकारांशी वार्तालाप केला. विद्यमान आमदार आणि उमेदवारांशी, तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून नाराजी गैर समज दूर करण्यात यश आल्याचा दावा महाजन यांनी यावेळी केला.
लोकसभेला याच पद्धतीने दावा केला असताना अपेक्षित यश मिळाले नाही, विधानसभा निवडणुकीतही तोच दावा कुठल्या आधारावर करीत आहात, या प्रश्नावर उत्तर देतांना महाजन यांनी पुन्हा एकदा फेक नरेटिव्हच्या माथ्यावर खापर फोडले. यावेळी सरकारच्या कामाबद्दल मतदार समाधान व्यक्त करीत असल्याने असे फेक नरेटिव्ह यावेळी चालणार नाही. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. चार तारखेनंतर बंडोबा शांत होतील, चित्र स्पष्ट होईल असा विश्वास शेवटी त्यांनी केला.
संजय राऊत, मनोज जरांगे, राज ठाकरे या घटकांवर देखील कटाक्ष टाकला.