मंगेश चव्हाण यांचा प्रचार करणाऱ्या रिक्षा चालकांना जीवे ठार मारण्याची धमकी; गुंडगिरी विरुद्ध रिक्षा व्यावसायिक संतप्त; चाळीसगावच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह
मंगेश चव्हाण यांचा प्रचार करणाऱ्या रिक्षा चालकांना जीवे ठार मारण्याची धमकी;
गुंडगिरी विरुद्ध रिक्षा व्यावसायिक संतप्त;
चाळीसगावच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह
चाळीसगाव प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या प्रचारात शेवटच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार कराल,तर जीवे ठार मारू अशी धमकीच चाळीसगाव शहरात राजकीय पक्षाने पाळलेल्या गुंडांनी रिक्षा व्यवसायिकांना दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.
या संदर्भात सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,अपक्ष उमेदवार मंगेश कैलास चव्हाण यांचा प्रचार चाळीसगाव शहरातील काही रिक्षा व्यावसायिक करत होते. त्यांनी मंगेश कैलास चव्हाण यांच्याकडे प्रचारासाठी गाड्या लावलेल्या होत्या. प्रचार करत असताना भाजपच्या काही गुंड प्रवृत्तीने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली,प्रचाराची पत्रके वाटली तर मारून टाकू अशा पद्धतीची भाषा वापरली असा आरोप एका वृद्ध व्यवसायिकाने केला आहे.
अशाच पद्धतीने अनेक हात मजुरी करणाऱ्या व्यक्तींना यांनी जीवे ठार मारण्याची धमकी या अगोदर देखील दिलेली आहे जो व्यक्ती स्वतःच्या हातावर आपला पोट भरतो त्याला अशा पद्धतीने यांनी धमकविण्याचे काम केले त्या आजोबांचे वय काय आहे आणि या भाजपच्या भक्तांनी त्यांना अतिशय गलिच्छ भाषा वापरून धमकावले या अशा वाईट वृत्तीला हा तालुका कधीही थारा देणार नाही. अशा प्रतिक्रिया चाळीसगाव तालुक्यातून व्यक्त केल्या जात आहेत. यांची ही हुकूमशाही चाळीसगाव तालुक्याला कुठे घेऊन जाणार? जो व्यक्ती स्वतःच्या हातावर आपले पोट भरतो, त्याला अशा पद्धतीने यांनी धमकावणे कुठल्या धर्म संस्कृतीत बसते? त्या आजोबांचे वय काय आहे याचा कुठलाही विचार न करता या भक्तांनी त्यांना अतिशय गलिच्छ भाषा वापरून धमकावने याला कुठला जिहाद म्हणणार? या अशा वाईट वृत्तीला हा तालुका थारा देणार का? असे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.