होऊ द्या चर्चा :”आकाचा आका आहे कुठे ?” ३८ कोटींच्या लक्षवेधीतील आरोपावर “आकाच्या आकाचा” आकडा किती? शिक्षण विभागातील निर्दोष शिक्षकांवर परिणाम करणारा भयंकर भ्रष्टाचार
होऊ द्या चर्चा :”आकाचा आका आहे कुठे ?”
३८ कोटींच्या लक्षवेधीतील आरोपावर “आकाच्या आकाचा” आकडा किती?
शिक्षण विभागातील निर्दोष शिक्षकांवर परिणाम करणारा भयंकर भ्रष्टाचार
नाशिक प्रतिनिधी
शिक्षण म्हणजे ज्ञानप्राप्तीचे मंदिर. पण जेव्हा शिक्षण व्यवस्थेचा उपयोग काही भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःचा खिसा भरण्यासाठी केला, तेव्हा त्या व्यवस्थेचा पाया हादरतो. नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात अनियमितता ,बेकायदेशीर नियुक्त्या ,अपहार ३८ कोटींचा घोटाळा याबाबत तक्रारी व लक्षवेधी झाल्यात . या गैरव्यवहारामागे आका आणि त्यांच्या पिल्लावळी यांचा मोठा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, खरा प्रश्न असा आहे की, “आकाचा आका आहे कुठे?” म्हणजेच, या सगळ्याचा मास्टरमाईंड कोण? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे
३८ कोटींचा अपहार – कोण किती खात्रीने गेला?
नियमबाह्य नियुक्त्या , एकतर्फी बदल्यांचा बाजार , केंद्रप्रमुख पद नसताना बेकायदेशीर नियुक्त्या , बेकायदेशीर मुख्याध्यापक पद गैरव्यवहार,शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या,बोली लावून जागा मिळवा त्यात गैरव्यवहार , मर्जीतल्या ठेकेदारामार्फत गणवेश खरेदी , वैद्यकीय बिलात गैरव्यवहार, शाळा तपासणीत उघडपणे लाच मागणे , शिक्षकांच्या अर्जित व वैद्यकीय रजेसाठी लाचखोरी , अशा विविध मार्गांनी तब्बल ३८ कोटींची अफरातफर झाल्याचे उघड होत आहे . पण या रकमेचा वाटा कोणी कसा व किती घेतला?
*”आका” –*
मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाने यांनी सर्व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवले.अंदाजे १२- १५ कोटी रुपये थेट किंवा त्यांच्या विश्वासू लोकांमार्फत हस्तांतरण झाले असल्याची चर्चा आहे.
बनावट कंत्राटदार , एजंटांमार्फत ,सेवानिवृत्त व्यक्ती ( जो सगळ्या अधिकाऱ्यांचे कलेक्शनचे काम आजही करतो ) आणि शिक्षण संस्थांबरोबर व्यवहार करून मोठ्या रकमा स्वतःकडे वळवल्या.पदाचा वापर करून पैसे कमविण्यासाठी दबाव तंत्र वापरले.
“पिल्लावळी” –
हे ‘आका’चे हातपाय होते.
अंदाजे ८ – १०कोटी रुपये हे पिल्लावळीने विविध मार्गाने शाळा तपासणी , शिक्षक व महिला शिक्षक यांना विविध भिती दाखवून कधी गार्डन ,कधी हॉटेल मध्ये बोलवून जमा केल्याची चर्चा अनागोंदी भ्रष्टाचारावरचे पांघरून बाजूला करते.शिक्षकांच्या बदल्या आणि नियुक्त्यांसाठी लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार केला.
“आकाचा आका” – अदृश्य शक्ती ?
खऱ्या मास्टरमाईंडची ओळख उघड झालेली नाही, पण प्रश्न उपस्थित होतो की,आका आणि पल्लावळींना एवढी मोकळीक दिली कोणी?
एवढे मोठे घोटाळे कोणाच्या आशीर्वादाने झाले?
मनपा व जिल्हापरिषद मधील कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी यामध्ये किती वाटा उचलला आहे का ?तपास केला तर असे दिसून येईल की, मोठ्या पदावरील लोकांपर्यंत या पैशाचा काही भाग पोहोचला असेल. अंदाजे १० कोटी रुपये यंत्रणेतल्या मोठ्या ‘आकांच्या आका’पर्यंत पोहोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निर्दोष शिक्षकांचा बळी – एकदाचा गेला भो !
हा भ्रष्टाचार केवळ आर्थिक अपहारापुरता मर्यादित नव्हता. या सगळ्या गैरव्यवहारांमध्ये अनेक निष्पाप पुरुष आणि महिला शिक्षकांना अन्यायकारक त्रास दिला गेला.
पुरुष शिक्षक,महिला शिक्षकांची बदली आणि पैशांसाठी छळ
अनेक शिक्षकांना योग्य ठिकाणी नोकरी मिळण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागली.
पैसे न दिल्यास त्यांची बदली अडवली गेली किंवा दूरच्या भागात फेकण्यात आले.
बऱ्याच शिक्षकांना खोट्या आरोपांमध्ये अडकवले गेले.
महिला शिक्षकांचा मानसिक छळ:
महिला शिक्षकांना कामावर राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास दिला गेला.काही ठिकाणी जाणीवपूर्वक कामाचा ताण वाढवून त्यांना राजीनामा द्यायला लावला गेला. पुन्हा सेवेत घेण्यासाठी लाचखोरी करून ऑर्डर देण्यात आली सेवानिवृत्त शिक्षकानी पैसे न दिल्यास त्यांच्या फाइल्स खोळंबवण्यात आल्या. पेन्शनची फाईल अडवून लाचखोरीची मागणी करून गार्डन मध्ये साहेब येत आहे तुम्ही या !असे निरोप दिले गेले.
निर्दोष शिक्षकांचा तळतळाट –परिणाम भोगला तो ‘आका’नेच!
जेव्हा निर्दोष लोकांना अन्यायकारक त्रास दिला जातो, तेव्हा त्याचा परिणाम लवकरच दिसून येतो. अनेक शिक्षकांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात आवाज उठवला आणि अखेर त्यांच्याविरुद्ध चौकशीचा बडगा उचलला गेला. आका आणि त्यांच्या पिल्लावळींच्या टोळीला अडचणीत टाकणारे पुरावे समोर हळू हळू येऊ लागले.आकाने ज्या निष्पाप शिक्षकांना त्रास दिला, त्यांच्या तळतळाटाचा फटका त्याला बसला आहे.
“पण आकाचा आका आहे कुठे?” – अंतिम सत्य काय?
आता प्रश्न असा आहे की, या ३८ कोटींच्या भ्रष्टाचारामागील खरा सूत्रधार कोण?*
फक्त आका आणि पिल्लावळी दोषी आहेत का?*
यामध्ये मनपा व जिल्हापरिषद वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का?
माझ कोणी वाकड करू शकत नाही “ हे कुणाच्या भरवश्यावर? राजकीय दबावाखालीच हा भ्रष्टाचार चालत होता का?
यावर सखोल चौकशी झाली तर *”आकाचा आका’ कोण आहे हे उघड होईल.* अन्यथा हा घोटाळा दबला जाईल आणि दोषी मोकळे सुटतील.
लोकशाहीचा विजय होणार का?
सामान्य नागरिकांचा , अन्याय ग्रस्त शिक्षकांचा व नाशिककरांचा हा संघर्ष आहे. जर भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या समर्थकांना वाचवले गेले, तर हे पुन्हा घडणार. पण जर चौकशी पारदर्शक झाली आणि खर्या आरोपींना शिक्षा झाली, तर हा समान्य नागरिक , अन्यायग्रस्त शिक्षक आणि महिला शिक्षक आणि नाशिककरांचा यांचा विजय ठरेल.
“आकाचा आका आहे कुठे?”
हा प्रश्न नाशिकच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. आता वेळ आली आहे की प्रशासन आणि सरकार यांनी उत्तर द्यावेच लागेल !
(निलेश साळुंखे, अध्यक्ष नाशिक पॅरेट्स असोसिएशन यांच्याशी केलेल्या संवादावरून साभार )