क्राईम

सुरगाणा पोलिस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याची गरज  गुन्हेगारी वाढली; पोलिसांचा धाक संपला


सुरगाणा पोलिस ठाण्याला खमक्या अधिकाऱ्याची गरज 

गुन्हेगारी वाढली; पोलिसांचा धाक संपला

 

सुरगाणा प्रतिनिधी

तालुक्यात पोलीस खाक्याच गायब झाला असून त्याची जागा भ्रष्टाचाराने घेतल्याने तालुक्यात त्यामुळे कायदा सुव्यवस्था चे तीन तेरा वाजले असल्याचे चिञ निर्माण झाले आहे सुरगाणा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वसाहत आली असून आता पांढऱ्या कपडद्यातील पुढारी यांची चलती सुरु झाले आहे कायदा सुव्यवस्था असून नसल्यासारखी झाली असल्याचे दिसून येत आहे सुरगाणा पोलीस ठाण्यात येथे पोलीस खाक्या राहिला नसल्याचे चित्र आहे. या पोलीस स्टेशन मधे कुठला गुन्हा करा आणि आरोपी पोलीसांना लगेच मिळत नाही त्यामागील अर्थकारण कारणीभूत आहे किरकोळ भांडण करा नाहीतर दरोडा टाका पोलिसांनी अटक करताच त्याला सर्वासमोर किरकोळ पोलीसी खाक्या दाखवतात यामुळे आरोपी आणि नातेवाईक घाबरतात आणि मारू नका यासाठी तडजोडीला तयार होतात याचा फायदा घेऊन पोलीस आणि नातेवाइक यांच्यात चिरिमिरेि घेऊन आरोपीची बडदास्त ठेवली जाते काही गंभीर गुन्हयात तर आरोपी हा पोलिसांचा जावई आहे अशा प्रकारात त्याची बडदास्त ठेवली जाते यामुळे गंभीर गुन्ह्यातील आरोपी हा जरी उशीरा जामीनावर सुटला तरी त्याला अटक असण्याच्या काळात कुठलीच भीती बाटावी अशी बागणूक मिळाली नाही त्यामुळे बाहेर आल्यावर त्याच्या वर्तुणुकीत कुठलाही फरक पडत नसल्याचे सध्याच्या परिस्थितीत दिसून येत आहे कारण बाहेर आल्यावर आपल्या चार मित्र आणि स्वताशी सांगतो की काही करा पैसे फेकले तर पोलीस काही करत नाही आणि त्यामुळे आरोपी आणि मित्र त्यावर पुन्हा पुन्हा गुन्हे करत असल्याचे दिसले आहे तर याबाबत पोलीसाशी बोलले तर ते सांगतात कायदा कडक झाला आहे आमच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत अशा पळवाटा सांगून वेळ मारून नेत आहे परंतु सुरगाणा पोलीस स्टेशनला काही दिवसा पूर्वी शाहूरााजे साळवे, दिवानसिंघ वसावे, संदिप कोळी, निलेश बोडखे, सागर नांद्रे हे अधिकारी होऊन गेले त्याच्या काळात या भागातील गुन्हा करणाऱ्या मातब्बरांना पोलीसी खाक्या मिळाला आहे आरोपीना कसे

Advertisement

आणि कुठे मारायचे हे तुम्हाला ज्ञात आहे कुठला रक्तपात न करता जर पोलीसी खाक्या दाखवला तर पुन्हा गुन्हा करण्यास कोणी धजावणार नाही त्यांच्या काळात गुन्हा करण्यास गुन्हेगार का घाबरत होते मग आताच अशी परिस्थिती का असा सवाल केला जात आहे परंतु सध्या पोलीस खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून त्याची पाळेमुळे खूप खोल गेली आहेत याला वेळीच व्यसन घालणे गरजेचे आहे पोलिसांच्या कॉलर पर्यंत आरोपीचे हात गेले आहेत पुढील काळात यावरून भयंकर व्हायला नको कारण पोलीसांना मारहाण झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत यामुळे सर्वसामान्य नागरिक यांना तुमच्याकडुन खूप अपेक्षा आहेत त्यांचे संरक्षण तुमच्या हातात आहे त्यामुळे यापुढे कायदा सुव्यवस्था मोडणा-या आरोपींना पोलीसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे तोही भ्रष्टाचार मुक्त अन्यथा राहील पोलीस खाक्या म्हणजे आरोपींना जिवे मारणे नव्हे परंतु पोलीस खाक्याचा धाक असावा अशी रास्त अपेक्षा तालुकावासिय व्यक्त करीत आहेत.

 

पोलीस अधिकाऱ्यांचा वचक नाही

 सध्या कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाचा वचक कमी झाल्यामुळेच शहर परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढत चालला आहे. तेव्हा वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने सुरगाणा पोलीस ठाण्यात मर्जीतील नव्हे तर वर्दीतील अधिकाऱ्यांची गरज आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *