क्राईम

शिंदे ते जाळीचा देव पदयात्रेचे प्रस्थान


शिंदे ते जाळीचा देव पदयात्रेचे प्रस्थान
महानुभाव पंथियांची जिल्ह्यातील पहिली वारी; २२ दिवसांचा प्रवास
रश्मी मारवाडी / सिन्नर :
महानुभाव पंथियांचे श्रध्दास्थान असलेल्या जाळीचा देव दर्शनासाठी जिल्हाभरातील भाविकांच्या पदयात्रेचे शिंदे येथून नुकतेच प्रस्थान झाले असून सुमारे २५ दिवसांच्या प्रवासानंतर ही दिंडी जाळीचा देव येथे पोहचणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी दिली.
शिंदे येथे स्वामी चक्रधर स्वामींच्या पालखीचे पुजन करून पदयात्रेस प्रारंभ झाला. मोहदरी, ब्राम्हणवाडे, बारागाव पिंप्री, निमगाव-सिन्नर, केपानगर, हिवरगाव, म्हाळसाकोरे, करजगांव, कुंदेवाडी, नांद्रमध्यमेश्वर, धारणगाव, विंचूर, काळखोडफाटा, लासलगाव, टाकळी, शिंगवे दत्ताचे, रायपूर, मनमाड, पाणेवाडी, नांदगांव, न्यायडोंगरी, वापळी, हिंगोणे, कोठली, वडवेजुने, क्नाशी, लोहटार, पाचोरा, लोहारी, आंबेवडगाव, शेंदुर्णी, सोयगांव, अजिंठा, शिवणा, जळगांव, पिंपळगांव, हिसवळ, जळगाव खु, तरडखेड, मासरुक, तळेगांव, खडकी, बोरखेडा, गोविंदनगर मार्गे दि. २४ फेब्रुवारी रोजी दिंडी जाळीचा देव येथे पोहचणार आहे.
दिंडीतील भाविकांसाठी मग्णूम हॉस्पिटल वतीने गोळ्या- ओषधांची व्यवस्था करण्यात आली असून ठिकठिकाणी भाविकांसाठी चहा, नास्ता, भोजनाची व्यवस्था श्रीमती ज्योती गुंफेकर, सौ. शोभाबाई गुंफेकर, अशोक शिंदे, एक्नाथ दिये, श्रीमती सातपुते, रुस्तुभ कार्टे, कान्हेराज बाबा, दताभाऊ गोसावी, पटुशेठ सदगीर, कैलासशेठ बिन्नर, साहेबराव बिन्नर, मदन विन्नर, संपत पोटे, सुधाकर कुटे, प्रभाकर कुल्हाडे, कृष्णा फड, प्रकाश बोडके, भिंगारकर वावा, माधव कवडे, किरण कवडे, गणेश कवड़े, सुभाष, सांगळे आदींसह अनेक दानशूर व्यक्ती तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहेत.
दिंडी यशस्वीतेसाठी दत्तात्रेय गोसावी यांच्यासह महानुभाव पंथिय भाविक परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *