सुरगाण्यात तोंड दाबले, बाऱ्हे हद्दीतून मोकाट सुटले गोवंश तस्करांचा धुमाकूळ ;पोलिसांची दिशाभूल
सुरगाण्यात तोंड दाबले, बाऱ्हे हद्दीतून मोकाट सुटले
गोवंश तस्करांचा धुमाकूळ ;पोलिसांची दिशाभूल
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
………………….,…………………
सुरगाणा प्रतिनिधी
साधारण दीड वर्षांपूर्वी कपाळी भस्म लावत शिवभक्त म्हणवून घेणारा एक कर्म करंटा आईसमान गाईच्या रक्ताचे पाट वाहत असतांना त्यातच हात धुवून घेण्याची संधी साधत असल्याची चर्चा होती, त्या नराधमाच्या विरुद्ध मोहीम उघडून आम्ही त्याचा चेहरा चव्हाट्यावर आणल्यानंतर त्याने गोवंशाची तस्करी तूर्तास थांबवली असली तरी जन्मानेच कसाई (कुरेशी ) असलेल्या गो रक्त पिपासू तस्करांच्या कृत्याला बळ देण्याचे काम काही तथा कथित हिंदुत्ववादी चेहरे करीत असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.
त्यामुळेच प्रभू रामचंद्रांच्या पुनीत सहवासाने पावन झालेल्या नाशिक नगरी आणि जिल्ह्यात कथित हिंदुत्वाचा बुरखा फाडणाऱ्या गोवंश हत्येचा सातत्यक्रम काही थांबायला तयार नाही. या ठिकाणी कुणी काय खावे, काय ल्यावे हा मुद्दा अधोरेखित करण्याचा खट्याळ खटाटोप अजिबात नाही, मात्र कायद्याने प्रतिबंधित असलेल्या कारवाया उघडपणे होत असतील आणि त्या कारवायांमुळे अधर्म घडत असेल तर धर्माचे कथित रक्षक काय करतात ? विरोध करता येत नसेल हे एकवेळ समजू शकतो मात्र यातीलच काही चेहरे प्रतिबंधित गो हत्येला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठीशी घालणार असतील तर तो अधर्मच असा निष्कर्ष काढणारा प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे.
गो वंशाच्या तस्करीवर आम्ही सातत्याने लिहीत असल्याने यापूर्वी ज्या भागातून गो वंशाची तस्करी मोठ्या प्रमाणात होती, त्या सुरगाणा भागातील पोलिस यंत्रणा सतर्क झाल्याने या भागात या गो वंश तस्करांचे तोंड दाबल्याने बाऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत या गोवंश तस्करांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बा-हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आता गोवंश जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरु असून कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या तस्करांना बाऱ्हे पोलिसांचा कोणताही धाक नसल्याचे चित्र दिसत आहे. गोवंश तस्करांकडून रात्रीच्या अंधारात बे धडक अवैध वाहतूक करून धंदे सुरू असल्याने अनेक ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग,भरारी पथके कार्यरत असून देखील हा गोरख धंदा करणाऱ्यांना आळा का बसत नाही हा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे.सर्रासपणे अवैध गोवंश वाहतूक सुरू असल्याने गोवंश संरक्षक कार्यकर्ते भुषण रहाणे पाटील, राजेंद्र निकुळे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या बाबतीत वरदहस्त कुणाचा हा विषय सध्या चर्चीला जात आहे. ग्रामीण भागातील जनतेची दिशाभूल न करता पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्यावतीने केली जात आहे. तालुक्यातील अनेक गावांतून दररोज अवैध गोवंश वाहतूक होत असून त्याकडे संबंधित प्रशासन हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याची शंका उपस्थित होऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. गुजरात खडकी – करंजुल (पे) – ठाणगाव – बेडसे – जांभुळपाडा – मोधळपाडा – कळमणे – जाहुले – चिकाडी – मोखनळ – बोरवण – भनवड – वणी मार्गे नाशिक, उंबरठाण – वांगण (सु) – पळसन – मनखेड – ओरंभे – भनवड मार्गे नाशिक सारख्या मोठ्या शहरांकडे याची अवैध तस्करी होत असून अवैध गोवंश तस्करी रात्री बे रात्री पिकअप सारख्या वाहनांमधून होत असल्याने ह्या गावांतील नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
. ….
कपाळी टिळा लावून , हिंदुत्वाचा राग आळवणारे असंख्य महिषासूर गुजरात सीमेवर असलेल्या भागातून गोवंशाची तस्करी करणाऱ्या कसायांना पाठीशी घालीत असल्याने उरला सुरला गोवंश संपुष्टात येत आहे. आपली दुनियादारी आणि रयतेचा आवाज परिवाराच्या माध्यमातून या गो वंश हत्याऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी नववर्षांपासून सातत्याने मोहीम राबविणार आहे. हातात जे माध्यम आहे त्याचा पुरेपूर वापर करून या गो वंशाचे रक्त पिणाऱ्या प्रत्येकाला, मग तॊ तस्कर असो नाही तर खाकीचा रक्षक, त्याचा बुरखा फाडण्याचे काम हा परिवार गेल्या दहा बारा वर्षांपासून सतत करीत आहे. भविष्यातही करीत राहील.
………….
प्रभू रामचंद्रांच्या पुनीत सहवासाने पावन झालेल्या नाशिक नगरीत गो वंशाची हत्या करणारे कत्तलखाने उघडपणे सुरु आहेत. नव्याने मिळालेल्या माहितीनुसार सातपूर अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील हा बेकायदेशीर व्यापार जोरात सुरु असल्याची चर्चा आहे.या बेकायदेशीर व्यवसायाला रोखण्याची हिम्मत ना पोलिस प्रशासन करते ना कथित हिंदुत्व रक्षक. जे सुरगाणा पोलिसांना समजले ते बाऱ्हे पोलिस आणि कथित हिंदुत्ववाद्यांना कधी समजणार?ज्यांनी गो वंशाचे रक्षण करायचे त्यातीलच काही सन्माननीय अपवाद वगळता काही कंटक प्रवृत्ती विविध दल आणि संघटनांचा बुरखा पांघरून जिल्ह्यातील कसायांना पाठीशी घालीत असल्याचे भयाण वास्तव आहे.
नाशिक शहर आणि जिल्हा मंदिराचा भुभाग म्हणून ओळखला जातो. धर्माचे अनेक दाखले या मातीत रुजले आहेत. धार्मिक नगरी म्हणून नाशिक शहरच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक गावाला कुठला न कुठला इतिहास आहे. मात्र याच मातीत गो वंशाचे रक्त शिंपडून त्यावर स्वार्थाचे पिक सोंगन्याचे पाप तिलक धारीच करीत असतील तर या जिल्ह्याला धार्मिक नगरी कसे म्हणायचे? असा प्रश्न गो भक्त विचारीत आहेत.
गो वंश हिंदू धर्मात पूजनीय आहे. यातील धार्मिकता बाजूला ठेवली तरी गो वंशपासून मिळणारे उपज अखिल मानव जातीला उपकारक आहे. याचा विचार करून गोवंश रक्षणाची जबाबदारी अखिल मानव जातीची असतांना, इतरांचे जाऊ द्या गाईला माता म्हणणारे काही नराधम तिचे रक्त पिण्यासाठी आसुसलेले असतील तर इतरांना दोष का द्यायचा? आणि यांना धर्मवेडे तरी का म्हणायचे?गाईला आई म्हणत कवटाळणाराचं जर तिचा रोज गळा कापून मरण यातना देत, अर्धमूत गोमातेची चामडी सोलत असेल तर त्या गायी डोळ्यांतील थीजलेल्या अश्रृंनी करीत असलेल्या याचना पाहून देखील हृदय हेलावत नसेल,तर आमच्या सारखे धर्म करंटे आम्हीच.
कत्तलखान्यात गाईच्या मानेवर सुरा चालवणाऱ्या कसायला केवळ दोष देण्यात अर्थ नाही तर आपल्याच गोठ्यात बांधलेली माय आणि तीचा वंश खुन्टीची दोरी आपल्याच हाताने सोडून दाराशी आलेल्या कसायाच्या तिलकधारी दलालाच्या हातात देत असेल , उंबरठाण, पेठ, कळवण सटाणा या भागातून मालेगाव, नाशिक सारख्या ठिकाणी जिवंत गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक, कत्तलखान्यातून बाहेर जाणारे गोवंशाचे मांस आणि जिवंत गोवंश बेकायदेशीरपणे नाशिक शहरातून संगमनेर,मुंबईकडे राजरोस जात असतांनाही आम्ही सारेच केवळ बघ्याची भूमिका घेणार असू तर आमच्या सारखे धर्म करंटे आम्हीच. अशा तीव्र भावना गो भक्त अतिशय संतप्तपणे व्यक्त करीत आहेत.