साहित्य समाजाला दिशा देण्याचे साधन: श्रीकांत मोरे सुरेश कुंकूलोळ लिखित माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या दोन पुस्तकांचे बार्शीत प्रकाशन व्यकंटेश जोशी, बाळासाहेब पानसरे, वैभव वानखडे आ.दिलीप सोपल, संदीप काळे यांची उपस्थिती
साहित्य समाजाला दिशा देण्याचे साधन: श्रीकांत मोरे
सुरेश कुंकूलोळ लिखित माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या दोन पुस्तकांचे बार्शीत प्रकाशन
व्यकंटेश जोशी, बाळासाहेब पानसरे, वैभव वानखडे आ.दिलीप सोपल, संदीप काळे यांची उपस्थिती
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
१ जानेवारी नव्हे, तर चैत्र पाडवा पासून आपले नवे वर्ष सुरु होते.
सोलापूर (प्रतिनिधी)
साहित्य सामाजिक जीवनाशी नक्कीच निगडित असावे, कारण साहित्य हे समाजाचा आरसा मानले जाते. समाजात घडणाऱ्या घटना, बदल, समस्या, संस्कृती, परंपरा, तसेच विचारधारा यांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये दिसून येते. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, ते समाजाला दिशा देण्याचे, विचार प्रवर्तित करण्याचे, तसेच जनजागृती करण्याचे प्रभावी माध्यम आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक सहकार महर्षी श्रीकांत मोरे यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ उद्योजक सुरेश कुंकूलोळ लिखित माझ्या नोंदी व अर्थपूर्ण शोध या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नयन प्रकाशन व कुंकुलोळ परिवाराने आयोजीत केले होते,त्या सोहळ्यात श्रीकांत मोरे बोलत होते.
प्रकाशन सोहळ्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत व्यकंटेश जोशी, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृक्षमित्र बाळासाहेब पानसरे, रेणूकॉर्प ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वानखडे आ. दिलीप सोपल, व्हॉईस ऑफ मिडियाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे मान्यवर उपस्थित होते.
मोरे म्हणाले, समाजातील विविध स्तरांतील समस्या आणि विचारसरणीवर भाष्य करतात हे दोन्ही पुस्तके भाष्य करतात.
ते मानवी नातेसंबंध, समाजातील अडचणी, आणि जीवनमूल्यांवर आधारित आहेत. या साहित्यकृती समाज बदलण्यासाठी प्रेरणा देतात आणि मानवी भावभावनांचे सूक्ष्म निरीक्षण करतात.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यात लेखक सुरेश कुंकुलोळ यांच्या ८१ व्या वाढदिवसपूर्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. वाचन संस्कृती टिकवणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वाचन ही फक्त ज्ञान संपादनाची प्रक्रिया नसून, विचारशक्तीला चालना देणारी आणि समाजाला प्रगल्भ करणारी प्रक्रिया आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे वाचनाची सवय कमी होत आहे, त्यामुळे वाचन संस्कृती जतन करण्यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि रेणूकॉर्प ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वानखडे यांनी व्यक्त केले.
वाचनामुळे व्यक्ती विविध विषयांवर ज्ञान प्राप्त करू शकते आणि आपल्या विचारसरणीत सुसूत्रता आणू शकते.
माणूस प्रश्न विचारायला शिकतो आणि गोष्टींचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवतो. असे मत ज्येष्ठ विचारवंत व्यकंटेश जोशी यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृक्षमित्र बाळासाहेब पानसरे म्हणाले,वाचनामुळे व्यक्तीची भाषा सुधारते, नव्या शब्दांची ओळख होते आणि लेखन कौशल्य विकसित होते.
मी कुंकुलोळ यांची आज दोन्ही पुस्तकं वाचली. या दोन्ही पुस्तकांनी मला विचार करायला भाग पाडले आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आज आपण अनेक वेगवेगळ्या तडजोरी करतो. पण, या तडजोरी करत असताना मानवी मूल्य जपले पाहिजे याची शिकवण देणारे हे दोन्ही पुस्तक आहेत. असे मत या सोहळ्याचा समारोप करताना आ. दिलीप सोपल यांनी व्यक्त केले. अजित कुंकुलोळ यांनी सर्वांचे आभार मानले.
…..
…