अवैध गुटखा वाहतुक 15 लाख 21 हजाराचा ऐवज जप्त दिंडोरी पोलिसांची कारवाई – वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक पोलिसांचा डाव फसला, संशयित फरार झाला की केला, यावर प्रश्न चिन्ह
अवैध गुटखा वाहतुक 15 लाख 21 हजाराचा ऐवज जप्त दिंडोरी पोलिसांची कारवाई –
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक पोलिसांचा डाव फसला, संशयित फरार झाला की केला, यावर प्रश्न चिन्ह
नाशिक -प्रतिनिधी
वारंवार कारवाया होऊनही गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात गुटख्याची तस्करी सुरुच असुन दिंडोरी पोलिसांनी सावळ घाटात आठ लाख रुपयांची पिकअप व सात लाख एकवीस हजाराचा गुटखा असा एकुण 15 लाख 21 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. फरार संशयीताचा शोध पोलिस घेत आहेत.असे सांगितले जात असले तरी ज्यांनी ही कारवाई केली त्यातीलच काहींनी संशयिताला फरार होण्यास मदत केल्याची चर्चा पोलिसांच्या एकूण कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष दर्शी तसेच पोलिसातील आमच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीत तफावत आढळत असल्याने कागदावर उतरवलेली माहिती खरी कशी मानायची, हा प्रश्न आहे. याआधी वणी हद्दीतील ते प्रकरण गुप्ततेच्या गुलदस्त्यात असताना दिंडोरी पोलिसांची कारवाई देखील संशयाच्या भोवऱ्यात आहे.
याबाबत दिंडोरी पोलिसांनी दिलेली माहीती अशी , गुजरात राज्यातुन महाराष्ट्रात पिकअप वाहनामधुन गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहीती मिळताच दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तैनात करण्यात आले. पेठ नाशिक या मार्गावर सावळ घाटाचे वर गोळशी शिवारात MH – 46 -BF – 4165 या क्रमांकाचे पिकअप वाहन या ठिकाणी मार्गक्रमण होत असताना संशयावरुन पोलिसांनी हे वाहन अडविले व तपासणी केली असता 12 बारदानी भोत्यात सफेद रंगाचे गोणीत छोट्या दहा प्रत्येक बॕगमधे विमल पान मसाल्याचे 22 पॕकेट प्रत्येकी किम्मत 198 रुपये एकुण 2640 पॕकेट एकुण किम्मत 5 लाख 22 हजार 720 ,निळ्या रंगाच्या पाच गोण्या प्रत्येक गोणीत 10 प्लाॕस्टीकच्या बॕग सुगंधित तंबाखुचे 2640 पॕकेट किम्मत 58 हजार 80 रुपये ,विमल पान मसाल्याचे 780 पॕकेट किम्मत 1 लाख 17 हजार रुपये , सुगंधित तंबाखुचे 780 पॕकेट किम्मत 23,400 व 8 लाख रुपयांचे वाहन असा एकूण 15लाख 21 हजार 200 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखु व गुटखा सदृष्य ऐवजाची वाहतुक करणारा वाहनचालक फरार झाला असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
सूत्रांची माहिती :
दिंडोरी पोलिसांनी कागदावर घेतलेली माहिती त्यांच्या वरिष्ठांना आणि प्रसार माध्यमांना दिली असली तरी, वास्तव मात्र वेगळेच असल्याचे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. पोलिसांच्या दाव्यानुसार संध्याकाळी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष दर्शीच्या दाव्यानुसार सकाळी साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान ही संशयित गाडी दिंडोरी पोलिसांनी पकडली होती. प्रत्यक्षात पकडलेल्या गाडीचा क्रमांक आणि गुन्हा नोंदविताना सांगितला जात असलेला क्रमांक, हे दोन्ही क्रमांक वेगवेगळे आहेत असा प्रत्यक्ष दर्शीचा दावा आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात फरार झालेल्या संशयिताचे, गाडी चालकाचे, हा गुटखा कुणाचा, त्याचेही नाव दडवून ठेवल्याने सारा मामला संशयास्पद आहे. आमच्या माहितीनुसार ही गाडी पकडली गेल्यानंतर, उभय पक्षात चर्चा सुरु होती. दरम्यानच्या काळात या प्रकरणाची कुणकुण आडगाव स्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागल्यानंतर तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जारी झाल्याने चर्चा अर्ध्यावर सोडून नाईलाज म्हणून गुन्हा दाखल झाला. मात्र तेव्हढ्या गडबडीत देखील गुटखा माफियाला फरार करण्याचे भान राखले गेले. प्राप्त माहिती नुसार गुटखा तस्करी अंग वळणी पडलेला हा गुटखा माफिया दिंडोरी पोलिसांच्या मर्जीतील असून वणी पोलिस दलातही त्याचे काही हस्तक कार्यरत आहेत. याचाच अर्थ आडगावची यंत्रणा कितीही दक्ष असली तरी प्रत्यक्ष फिल्डवर घरभेदी काम करीत असल्याने कारवाया केवळ फार्स ठरत आहेत.म्हणूनच वणी पोलिसांचा तो कथित छापा फार्स अजूनही उघडकीस आणला जात नाही.