क्राईम

साकुर गावात भर दुपारी ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा; आधी गोळीबार, नंतर लूट, किंमती ऐवज लुटला, संगमनेर तालुक्याची कायदा सुव्यवस्था ऐरणीवर 


साकुर गावात भर दुपारी ज्वेलरीच्या दुकानावर दरोडा;

 

आधी गोळीबार, नंतर लूट, किंमती ऐवज लुटला, संगमनेर तालुक्याची कायदा सुव्यवस्था ऐरणीवर 

 

 

 

संगमनेर युनूस शेख

 

तालुक्यातील साकूरमध्ये भर दुपारी पाच दरोडेखोरांनी बंदूकीचा धाक दाखवत सोन्याच दूकानच लूटून नेल्याची घटना वार – सोमवार दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली. धक्कादायक बाब म्हणजे दूकानासमोर या दरोडेखोरांनी आधी हवेत गोळीबार केल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यानंतर थेट दूकानात घूसून बंदूकीचा धाक दाखवत दूकानातील माल लूटून नेला. विशेषतः भरदिवसा गजबजलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडालीय. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Advertisement

 

साकूर बसस्थानकजवळ निखील सुभाष लोळगे यांचं कान्हा ज्वेलर्सचे दूकान आहे. दुपारी पावणे दोनच्या सुमारास दूकानातील कामगार जेवण करायला गेले होते. दूकानात एक जण कामगार होता. याच वेळी पल्सर गाडीवर पाच दरोडेखर दुकानासमोर आले. थेट कान्हा ज्वेलर्सच्या दूकानात घुसून कामगाराला बंदूकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लूटून नेला. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेल्या असल्याची माहिती समोर आलीय. दरोडेखोरांनी गंठण, चैनी, मंगळसूत्र, वाट्या, कान चैनी, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदि सोन्याचं माल घेऊन पारनेरच्या दिशेने फरार झाले आहे. यावेळी दरोडेखोरांनी पळून जाताना फायरिंग केली.

 

 

दरम्यान ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अक्षरशः एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती रऊफ शेख यांनी तातडीने घारगाव पोलिसांना दिली. त्यानंतर घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दूकानाची पाहणी करत काही पोलिस कर्मचारी थेट दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गस्थ झाले आहे.

 

दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावरील गावांत या दरोडेखोरांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मांडवे फाटा, खडकवाडी या ठिकाणी दरोडेखोरांनी फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *