भिकुसा हायस्कूलमध्ये संपन्न झाला विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा ; आपले भविष्य हे आपल्या हातात, हातांच्या रेषांवर नव्हे:सुधीर तांबे
भिकुसा हायस्कूलमध्ये संपन्न झाला विद्यार्थी गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा
आपले भविष्य हे आपल्या हातात, हातांच्या रेषांवर नव्हे:सुधीर तांबे
सिन्नर प्रतिनिधी
सिन्नर येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या, भिकुसा हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक गौरव आणि पारितोषिक समारंभ उदघाटक नाशिक पदवीधरचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे,व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक, युवा उद्योजक रामनाथ बोडके, उद्योजक रोटरीयन सतीश नेहे, केंद्रीय सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक संजय आव्हाड, साहेबराव केदार, नायगाव, प्रभाकर शेलार,विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बबन घुगे,पालक, अनिता जाधव माता पालक संघ उपाध्यक्ष, रेखा नेरकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत विद्यार्थी संपन्न झाला.
डॉक्टर सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांचे तसेच मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी जगाच्या व्यासपीठाचा उपयोग करून व व्यवहार ज्ञान प्राप्त करून जीवन घडवावे तसेच भारतीय आजच्या युगात जगावर राज्य करत आहे त्या संधीचे आपण सोने करावे असे आश्वासन देत. श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका असे आवाहन केले. सर्वांनी उच्चशिक्षित होऊन आपले जीवन सफल करावे असा अनमोल संदेश देत आपले जीवन घडवत असताना हातावरील रेषांवर विश्वास न ठेवता आपल्या हातात म्हणजेच श्रमावर विश्वास ठेवा व कार्य करून यशस्वी व्हा. हा अनमोल संदेश दिला.
संजय आव्हाड यांनी जीवनामध्ये शिक्षणाबरोबरच खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळामुळेच आपले जीवन स्वयंपूर्ण होते हा संदेश देत येणाऱ्या काळात शाळेसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले.
रामनाथ बोडके यांनी सामाजिक कार्यकरतांना स्वतःबरोबरच देशाचाही विकास करावा असा अनमोल संदेश देत जीवनामध्ये प्रत्येकाने आलेल्या संधीचे सोने करा व कला जोपासा असे सांगितले. तसेच अनुभवाची शिदोरी घेऊनच मनुष्य यशस्वी होत असतो असा संदेश देताना प्रत्येक विद्यार्थ्याने व्यवसायाभिमुख शिक्षण घ्यावे. नोकर बनण्यापेक्षा मालक बनण्याचा सतत प्रयत्न करा असा मार्ग विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाळे यांनी शाळेचा प्रगतीचा आलेख उंचावत आहे. हे सांगत असताना आपण जीवनामध्ये एक आदर्शवत नागरिक व्हावे. तसेच शाळा नवे पंख घेऊन भरारी घेत आहे. एक आदर्शवत व मार्गदर्शक शाळा सिन्नरची ठरत आहे असे सांगितले. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी संख्या वाढीसाठी वर्षभर नवनवीन उपक्रम घेऊन संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी विद्यालय सतत प्रयत्न करत आहे. भिकुसा विद्यालयाचे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपलं नेतृत्व करत आहे असे सांगितले.
कार्यक्रमाच्या वेळी वार्षिक अहवाल वाचन विद्यालयाचे क्रीडा शिक्षक रामनाथ जाधव यांनी केले. यावेळी वर्षभर विद्यालयाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे खेळाडू खेळत आहे असे सांगत. त्याचबरोबर शैक्षणिक, सांस्कृतिक दर्जा सुद्धा जोपासण्याचे काम विद्यालय करत आहे ही माहिती दिली.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा, सांस्कृतिक, वकृत्व, निबंध, गायन, आयगेन अशा विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा यथोचित प्रशस्तीपत्र व ट्रॉफी आणि ढाल देऊन सन्मान करण्यात आला. सर्व यशस्वी विद्यार्थी आनंदात व उत्साही वातावरणात हा सन्मान स्वीकारत होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सांगळे व कविता बच्छाव यांनी केले. तसेच मान्यवरांचे आभार प्रभाकर बोडके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.