क्राईम

उपनगर पोलीसांनी वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत ; उपायुक्त मोनिका राऊत, सहा. पोलिस आयुक्त बारी यांचे मोलाचे मार्गदर्शन 


  1. उपनगर पोलीसांनी आरोर्पीना अटक करून वयोवृध्द महिलेचे चोरी झालेले 22 तोळे सोने केले हस्तगत;

 

उपायुक्त मोनिका राऊत, सहा. पोलिस आयुक्त बारी यांचे मोलाचे मार्गदर्शन 

 

नाशिक प्रतिनिधी

दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सुहासिनी विष्णू साने या ८१ वर्षाच्या महिलेचे चोरी गेलेले २२ तोळे सोने उपनगर पोलिसांच्या अथक तपासातून परत मिळविण्यात यश आले आहे. या तपासकामात परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, विभाग चारचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तसेच मार्गदर्शन मोलाचे ठरले.

 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, नाशिक रोड परिसरातील तरण तलाव जवळील जगताप मळ्यात राहणाऱ्या ८१ वर्षांच्या सुहासिनी विष्णु साने,यांच्या घरातून दि.६ फेब्रुवारी २०२४ रोजी २२ तोळे सोने चोरीला गेले होते.

Advertisement

 

त्या घरातुन बाहेर गेलेले असतांना अज्ञात इसमाने घरात प्रवेश करून घरातील एकूण सुमारे 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे चोरून नेल्याची तक्रार उपनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राउत सहायक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ. सचिन बारी यांनी ताबडतोब घटनास्थळी भेट देवून उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे यांना आरोपिंचा शोध घेवून अटक करण्याचे आदेश दिले. उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे यांनी उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सपोनि सचिन चौधरी व पथक यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेश केले. त्यानुसार पो.शि. जयंत शिंदे यांनी सीसीटीव्ही कॅमेरांचे मदतीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे तसेच सपोनि चौधरी व पो.शि. गौरव गवळी यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपींचा शोध घेवून आरोपी दत्तु साहेबराव पाटील, वय 50 वर्षे, रा. टाकळी गाव, प्र.चा. पोस्ट ओझर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव याला पाचोरा जि. जळगाव येथून अटक केले. आरोपीला अटक करून सपोनि सचिन चौधरी, पोहवा विनोद लखन, पो. हवा. इम्मान शेख, अनिल शिंदे, पोशि सुरज गवळी, पोशि संदेश रघतवान, पोशि पंकज कर्पे असे पथकाने त्याचा साथीदार रामचंद्र कृष्णा पाटील वय 62 वर्षे, रा. सीतागुफा रोड, एसबीआय बँकेच्या एटीम समोर, पंचवटी नाशिक याला पंचवटी येथून अटक करण्यात आले व सदर गुन्हयात चोरी केलेले एकूण 22 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

 

  • सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राउत व नाशिक रोड विभागाचे सपोआ डॉ सचिन बारी, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि जितेंद्र सपकाळे, गुन्हे शोध पथकाचे सपोनि सचिन चौधरी, पोउपनि सुरेश गवळी, पोहवा विनोद लखन, पो.हवा. इम्रान शेख, पोशि. जयंत शिंदे, पो.शि. गौरव गवळी, अनिल शिंदे, पोशि सुरज गवळी, पोशि संदेश रघतवान, पोशि पंकज कर्पे, पोशि मिलींद बागुल, पोशि. सुनिल गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण विभागाचे मपोउपनि नेहा सुर्यवंशी, पोशि गणेश रूमाले नाशिक शहर यांची मदत घेवुन गुन्हा उघउकीस आणला. आरोपीतांकडुन चोरी केलेले दागिने ताब्यात हस्तगत केलेले असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि सचिन चौधरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *