जिल्ह्यातील वाढत्या युवा गुन्हेगारीला जबाबदार कोण?
जिल्ह्यातील वाढत्या युवा गुन्हेगारीला जबाबदार कोण?

नाशिक जिल्ह्यात बाल गुन्हेगारी, युवा गुन्हेगारीला ऊत आला असून संघटित गुन्हेगारी निर्माण झाल्याने अवैध गावठी दारु, जुगार, गावठी कट्टे, प्राणघातक हत्यार, गांजा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शहरासह तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण? पोलिस प्रशासन की शहरातील राजकीय पुढारी असा सर्व सामान्य जनतेला प्रश्न पडला आहे. शहरातील परिसरामध्ये मध्ये युवा पिढी गुन्हेगारी मार्गाच्या वाटेवर गेली असुन जो तो युवक चाकु, गावठी पिस्तूल जवळ बाळगत असल्याचे प्रत्यक्ष अनेक गुन्हे प्रकरणातून समोर आले आहे. जुगार अड्डे वाढले असून येथील पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे युवा पिढी वाममार्गाला लागली त्याचा सर्व सामान्य लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. करिअरच्या उंबरठ्यावर असताना गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणाईला या दलदलीतून बाहेर काढण्याची गरज आहे. किरकोळ चोऱ्या, मारामारी यासारख्या किरकोळ गुन्ह्याबरोबर खून, खुनी हल्ल्यातही अल्पवयीन मुले, युवक आणि तरुणाईचा सहभाग दिसू लागला आहे. गेल्या दहा पंधरा वर्षांत टोळीयुद्धातून अनेक गुन्हे. दाखल असून त्यामध्ये अल्पवयीन मुले, युवकांचा सहभाग अनेकदा दिसून आला. दहा-पंधरा वर्षीपुर्वी अल्पवयीन गुन्हेगार म्हणून पोलिस दफ्तरी नोंद असलेले आज गुंड म्हणून मिरवत आहेत. गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांना योग्य ‘ट्रॅक’वर आणले नसल्यामुळे हे घडले. त्यांचाच आदर्श घेऊन गुन्हेगारी टोळ्यात मुले, युवक ओढले जात आहेत. महाविद्यालयापासूनच गुन्हेगारीची सुरुवात होताना दिसते. महाविद्यालयातील विविध गुन्हेगारांचे ग्रुप्स आणि त्यांच्यातील वर्चस्वाच्या स्पर्धेत कळत-नकळत युवक ओढले जातात. अनेकांच्या दुचाकीवर गुंडांच्या ग्रुपची अद्याक्षरे झळकताना दिसतात, वर्चस्वातून एकमेकांची कॉलर पकडणारेच पुढे हातात शत्र घेऊन,अंगावर धावून जातात. कॉलेजमधील गुप्स मोडीत काढण्याची आज खरी गरज आहे. शाळा, कॉलेजच्या बाहेर टवाळकी करणाऱ्याला वेळीच पकडून त्यांच्या पालकांपुढे हजर केले पाहिजे. पोलिस दलाच्यावतीने होणारी कारवाई पुरेशी नसून कॉलेज प्रशासनाने देखील कारवाईस हातभार लावला पाहिजे. मुलांची गुन्हेगारीकडे वाटचाल रोखण्याची खरी जबाबदारी पालकांची आहे. मुलांचे मित्र कोण? ते कोणाबरोबर असतात? शिक्षणातील प्रगती यापासून ते सोशल मीडियावर काय करतात? याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. पश्चात्तापाची वेळ येण्यापूर्वीच पालकांनी दक्षता घेतली पाहिजे. मुलांमधील नकारात्मकता, विचार करण्याची प्रवृत्ती नसणे, परिस्थितीचे आकलन न होणे हा सध्याच्या पिढीमधील महत्त्वाचा दोष आहे. नकार पचवण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे.
चौकट
दुचाकीवर गुंडांच्या ग्रुप्सची नावे
विविध गुन्हेगारांचे ग्रुप्स आणि त्यांच्यातील वर्चस्वात कळत- नकळत युवक ओवले जातात. अनेकांच्या दुवाकीवर गुंडांच्या ग्रुप्सची अद्याक्षरे झळकताना दिसतात. वर्चस्वातून एकमेकांची कॉलर पकडणारेच पुढे हातात शस घेऊन अंगावर धावून जातात. कॉलेजमधील गुप्स मोडीत काढण्याची आज खरी गरज आहे. शाळा, कॉलेजच्या बाहेर टवाळकी करणाऱ्या वेळीच पकडून त्यांच्या पालकांपुढे हजर केले पाहिजे. पोलिस दलाच्यावतीने होणारी कारवाई पुरेशी नसून कॉलेज प्रशासनाने देखील कारवाईस हातभार लावला पाहिजे
*रागाने का बघितलेस?*
रागाने का बघितलेस? यासारख्या क्षुल्लक कारणातून देखील खून होऊ लागले तर भविष्यातील गुन्हेगारी आणखी भयावह असू शकते. गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुंडगिरीचा शेवट हा वाईटच असतो हे अनेक घटनातून दिसून आले. तरीही युवकांमधील गुन्हेगारीचे आकर्षण कमी झाले नाही हे समाज व्यवस्थेचे अपयशच म्हणावे लागेल.