नवर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर; प्रवाशांना स्थानकावर ताटकळत थांबावे लागणार नाही; 10,000 गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा
नवर्षापासून बसगाड्यांचे लोकेशन दिसणार प्रवाशांच्या मोबाईलवर;
प्रवाशांना स्थानकावर ताटकळत थांबावे लागणार नाही; 10,000 गाड्यांना ट्रॅकिंग यंत्रणा
किरण घायदार / नाशिक
आता आपली लालपरी कुठे आहे हे बघण्यासाठी फोन करायची गरज नाही कारण आता एस टी बस कुठे आहे आपल्या मोबाईलवर कळणार आहे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे दूर होणार आहे.
बसची वाट पाहात तासन्तास बसस्थानकावर देखील थांबावे लागणार नाही. कोणत्या मार्गावरील, कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती आता त्या अॅपद्वारे घरबसल्या समजणार आहे.
रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण, सामान्यांना त्यांची लालपरी कोठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसविण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्यःस्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे. याशिवाय उर्वरित पाच हजार बसगाड्यांनाही ही यंत्रणा बसविली जाणार आहे. त्यासंबंधीची यंत्रणा महामंडळाकडे उपलब्ध असून, नवीन वर्षात आता प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
एसटी बसमध्ये तांत्रिक झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या अॅपद्वारे समजणार आहे. अनधिकृतपणे बस कोठे थांबविली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्तवेळ बस थांबविली जातेय का, याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लालपरीच्या वेळापत्रकात सूसूत्रता येणार असून, प्रवाशांनाही बसगाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे.
*नववर्षात प्रवाशांसाठी ही सुविधा..*
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविली जाणार आहे. आतापर्यंत जवळपास दहा हजार गाड्यांना ही यंत्रणा बसविली असून त्याची सद्यःस्थिती पाहून उर्वरित गाड्यांनाही ती यंत्रणा बसविली जाईल. नववर्षात एसटीच्या सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर प्रत्येक बसगाडीचे लोकेशन दिसेल, त्यादृष्टीने नियोजन सुरु आहे.
– *डॉ. माधव कुसेकर,* व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे..
अॅन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार महामंडळाचे ‘एमएसआरटीसी’ अॅपद्वारे
महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल अॅपवरुन समजणार
आहे. बस कधीपर्यंत स्थानकावर येईल,हे समजेल त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही.