क्राईम

महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा नेस्तानाभूत करण्याच्या कामात सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांचेही खतपाणी – करण गायकर


महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा नेस्तानाभूत करण्याच्या कामात सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांचेही खतपाणी – करण गायकर

 

नाशिक प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचे काम राज्य सरकार करत आहे,तर विरोधक त्यांना मदत करत आहेत.शेतकरी,कामगार,आणि सहकार क्षेत्रातील लोकांचा विकास कसा होईल,यावर भाष्य व्हायला हवे होते, मात्र,सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपल्याच स्वार्थासाठी एकमेकांवर टीका करीत आहेत. अशी टीका छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केले.

 

काल जालना जिल्ह्यातील मातोश्री लॉन्स येथे छावा क्रांतिवीर सेना प्रणित भव्य मराठा दसरा मेळावा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.या मेळाव्याचे अध्यक्षस्थान कै.अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी भूषविले.तसेच,छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडला.शिवशाहीर सुरेश जाधव यांच्या शाहिरीने कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली.यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामानवांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

 

छावा क्रांतिवीर सेनेचा सहावा दसरा मेळावा जालना येथील मातोश्री लॉन्समध्ये साजरा होत असताना प्रमुख उपस्थिती म्हणून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.यात संस्थापक अध्यक्ष करण गायकर,कै.अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,जालना कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती भास्कर आबा दानवे मराठा समन्वयक सुनील बापू आर्दड, माजी नगराध्यक्ष राजेश राऊत,मराठा समन्वयक प्रशांत पाटील,जिल्हा परिषद सदस्य गणेश शेठ राऊत,नगरसेवक जगन्नाथ चव्हाण माजी नगरसेवक प्रशांत गाडे,नगरसेवक सतीश जाधव,युवा उद्योजक अनिल पाटील तिरके,महासचिव शिवाजीराजे मोरे,युवक प्रदेशाध्यक्ष शिवाभाऊ तेलंग,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे,प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत,प्रदेश संपर्कप्रमुख नितीन शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष किरण डोखे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश माने, कायदेशीर सल्लागार ऍड.अविनाश आवटे,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे,मराठवाडा संपर्कप्रमुख अमर शेख,मराठवाडा सचिव भगवान सोरमोरे महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष मनोरमाताई पाटील,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई सूर्यवंशी या मान्यवरांचा समावेश होता.

 

या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून

नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,

नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख नवनाथ वैराळ,सांगली जिल्हा प्रमुख दीपक मुळीक,बीड जिल्हा प्रमुख राहुल चाळक,अहिल्यानगर जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे,सोलापूर जिल्हा प्रमुख हर्षद भोसले,जळगाव जिल्हा प्रमुख मनोहर शिंदे,छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख कृष्णा काळे,नाशिक महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे,कामगार आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख योगेश पाटील,उद्योजक आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पाटील,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष किरण बोरसे,नासिक महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविताताई वाघ.आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात, संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी राज्य सरकारवर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.त्यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज,फुले,शाहू,आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला गालबोट लावण्याचे काम राज्य सरकार करत आहे,तर विरोधक त्यांना मदत करत आहेत.शेतकरी,कामगार,आणि सहकार क्षेत्रातील लोकांचा विकास कसा होईल,यावर भाषण व्हायला हवे होते, मात्र,सत्ताधारी आणि विरोधक दोघेही आपल्याच स्वार्थासाठी एकमेकांवर टीका करीत आहेत.”

 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली.”मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण देण्याचे सरकारकडे अजूनही गांभीर्य नाही,”असेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा लढा सुरू असताना, सरकारच्या भूमिकेवर त्यांनी कठोर टीका केली.

 

नामदार नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात मराठा आरक्षणाबाबत सरकारने सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र बसून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा शेतकरी कुटुंबांना कर्ज योजनांचा लाभ देण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. आतापर्यंत एक लाख लाभधारक आपण तयार करण्यात यशस्वी झालो त्याचप्रमाणे पुढील वर्षभरात पाच लाख अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे लाभधारक तयार करण्याची जबाबदारी आपण घेतो आहे आणि ती पूर्ण करणार मराठा समाजाचा मागासपणा कमी करण्याचा यातून प्रयत्न आपण सर्व करूया सारथी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना सरकारने आणलेले आहेत त्या ग्रामीण भागातील तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करून आपला मराठा समाज कसा सक्षम होईल यासाठी अधिक टाकतील या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आव्हान त्यांनी उपस्थित जनसमदायाला केले.

 

कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन छावा क्रांतिवीर सेनेच्या भावी कार्याचा निर्धार व्यक्त केला आणि शेतकरी,कामगार, सहकार,आरोग्य,शैक्षणिक,महिला व मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना आक्रमकपणे लढत राहील,असेही ठामपणे सांगितले.यावेळी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दसरा मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी जालना जिल्हा प्रमुख राम पाटील गाडेकर युवक जिल्हाप्रमुख गजानन पाटील ढवळे मराठवाडा उपाध्यक्ष महादेव कदम जिल्हा कार्याध्यक्ष बद्रीनाथ पाटील ग्रामीण जिल्हाप्रमुख विनोद पुंगळे गजानन सुरवसे शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख अर्जुन पठारे उपजिल्हाप्रमुख किरण जोशी ग्रामीण उपजिल्हाप्रमुख गजानन निंबाळकर शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख मदन गारखेडे जिल्हा संघटक अमोल महाराज गांजवे उद्योजक आघाडी जिल्हाप्रमुख सुनील जयस्वाल तालुका उपाध्यक्ष राम मडके वारकरी आघाडी जिल्हाप्रमुख ह भ प कैलास महाराज ठोंबरे विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख जयंत बोरा युवक जिल्हा सरचिटणीस राहुल पाटील डोरकुले ग्रामीण उपजिल्हाप्रमुख वामन निंबाळकर यांनी विशेष अशी मेहनत घेतली.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *