जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःपासूनच प्रेरणा घ्या- गोपी गिलबिले ; नावातर्फे जागतिक जाहिरात दिन उत्साहात साजरा
जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःपासूनच प्रेरणा घ्या- गोपी गिलबिले ;
नावातर्फे जागतिक जाहिरात दिन उत्साहात साजरा
नाशिक -प्रतिनिधी
जीवनात यशस्वी व्हायचे तर स्वतः पासूनच प्रेरणा घ्या आणि कानात आलेली गोष्ट मनात घ्या आणि आचरणात आणा, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते आणि कॉर्पोरेट ट्रेनर गोपी गिलबिले यांनी केले.
नाशिक अडव्हरव्हर्ताझिंग एजंसीज असोसिएशन तर्फे आयोजित राष्ट्रीय जाहिरात दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाशिक अंत्रप्रूनर फोरम चे संस्थापक अध्यक्ष संजय लोढा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थीत होते.
यावेळी शहरातील सर्व वृत्तपत्रे, एफएम आणि वृत्तवाहिन्यांच्या जाहिरात व्यवस्थापक व त्याच्या टीमचा सत्कार नावाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसएशनचे विनोद शहा नावाचे संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, अध्यक्ष प्रवीण चांडक, उपाध्यक्ष गणेश नाफडे, सरचिटणीस मिलिंद कोल्हे पाटील उपस्थित होते.
लोढा यांनी यावेळी मार्गदर्शन करताना, राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्ीय जाहिरात क्षेत्राचा मागोवा घेतला. कार्यक्रमास फ्रावशी इंटरनेशनल स्कूलचे अध्यक्ष रतन लथ, मराठा विद्याप्रसारक समाजचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे, मीडिया एक्झीबीटर्स संजय न्याहरकर,गंगोत्री इस्टेट अँड डेव्हलपर्स दीपक चव्हाण यांचे सहकार्य लाभले
सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. आभार दिलीप निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नावाचे रवी पवार, विठ्ठल राजोळे, सचिन गीते, साहिल न्याहारकर, अमोल कुलकर्णी, नितीन शेवाळे, राजेश शेळके, सुनील महामुनी, किरण पाटील, श्रीकांत नागरे, विठ्ठल देशपांडे, दीपक जगताप, श्याम पवार, दिनेश गांधी, शैलेश दगडे, अभिजीत चांदे, सुहास मुंदडा, पराग गांधी, हितेश गांधी, प्रवीण मराठे, सुभाष गांधी, योगेश पगारे यांनी प्रयत्न केले.