क्राईम

महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी आचार संहितेचा अंमल! सुटीच्या दिवशीही मंत्रिमंडळ बैठकांचा जोर ; दहा दिवसात जवळपास तेराशे शासन निर्णय


महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी आचार संहितेचा अंमल!

 

सुटीच्या दिवशीही मंत्रिमंडळ बैठकांचा जोर ; दहा दिवसात जवळपास तेराशे शासन निर्णय

 

 

 

मुंबई प्रतिनिधी

 

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सुटीच्या दिवशीही बैठका होऊन घाऊक शासन निर्णय होऊ लागल्याने आगामी ४८ तासात कुठल्याही क्षणी आचार संहिता अंमलात आणून विधानसभा निवडणुकीचे वेळा पत्रक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवार, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठक होत आहे. त्यात सत्ताधारी एकापाठोपाठ निर्णय घेऊन सवंग लोकप्रियता मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. अगदी रविवारच्या दिवशीही मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा रंगली आहे.

 

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी, सोमवारी मंत्रिमंडळाची सकाळी 9.30 वाजता बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे संकेत दिलेत की, येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु होणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात एक किंवा दोन टप्प्यात मतदान होऊ शकते. मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता अधिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

महिन्याभरात मंत्रिमंडळ किती वेळा बैठका?

23 सप्टेंबर : 24 निर्णय

30 सप्टेंबर : 38 निर्णय

4 ऑक्टोबर : 32 निर्णय

10 ऑक्टोबर : 38 निर्णय

 

सरकारकडून शासन निर्णयांचा धडाका

Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार जनतेला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनी शासन निर्णयांचा धडाका लावल्याचा पाहिला मिळत आहे.

 

10 दिवसांत एकूण शासन निर्णय : 1291

 

1 ऑक्टोबर : 148 शासन निर्णय

2 ऑक्टोबर : शासकीय सुट्टी

3 ऑक्टोबर : 203 शासन निर्णय

4 ऑक्टोबर : 188 शासन निर्णय

5 ऑक्टोबर : 2 शासन निर्णय

7 ऑक्टोबर : 209 शासन निर्णय

8 ऑक्टोबर : 150 शासन निर्णय

9 ऑक्टोबर : 197 शासन निर्णय

10 ऑक्टोबर : 194 शासन निर्णय

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

 

👉 *मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :*

👉 मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी

👉 आगरी समाजासाठी महामंडळ

👉 समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

👉 दमणगंगा एकदरे गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता

👉आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

 

👉 वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

 

👉 राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

👉 पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

👉 खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

👉 राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

👉 पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

👉 किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

👉 अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

👉 मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

👉 खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

👉 मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

 

👉 अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ अभ्यासगट

 

👉 ‘उमेद’साठी अभ्यासगट

 

👉 कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *