इच्छा तिथे मार्ग :-एम.डी. विक्री करणारे दोन पुरुष व एक महिला आरोपी जेरबंद; जवळपास पाच लाखाच्या एम डीसह ८,२२,५००/- मुददेमाल जप्त
इच्छा तिथे मार्ग :-एम.डी. विक्री करणारे दोन पुरुष व एक महिला आरोपी जेरबंद;
जवळपास पाच लाखाच्या एम डीसह ८,२२,५००/- मुददेमाल जप्त
नाशिक प्रतिनिधी
“इच्छा तिथे मार्ग” अशी एक म्हण मराठीत प्रचलित आहे. आपल्यावर असलेली जबाबदारी आणि त्या जबाबदारीने सोपवलेले कर्तव्य कसे पार पडते हे ज्याच्या त्याच्या इच्छा शक्तीवर अवलंबून असते, त्यातूनच ही म्हण मराठी भाषेत अधोरेखित झाली. नाशिक शहर पोलिस या म्हणीच्या कसोटीवर शंभर टक्के उतरले असून गेल्या वर्षभराच्या कार्यकाळात म्हणजे संदीप कर्णिक यांनी पोलिस आयुक्तालयाचा पदभार स्विकारल्यानंतर पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, त्यातही कर्मचाऱ्यांची मानसिकता पूर्ण बदलल्याचे सकारात्मक चित्र दिसत असून दाखल गुन्ह्यांची उकल करण्यासोबतच या शहराचे सामाजिक स्वास्थ बिघडवणारे, युवा पिढी उध्वस्त करणारे एम डी सारख्या अमली पदार्थांचे रॅकेटच्या मुसक्या बांधण्यापासून गाईच्या रक्ताने माखलेल्या हातांना बेड्या घालण्यापर्यंतची कामगिरी उंचावल्याचे समाधानकारक चित्र आहे.
यापूर्वी गुप्त बातमीदारांपासून काही सन्माननीय अपवाद वगळता काही अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत खबर मिळुनही कारवाई करण्याची इच्छा होत नव्हती. समाजातील अन्य घटक सोडा, जागता पहारा देणाऱ्या पत्रकारांनी माहिती देऊनही कारवाई होत नव्हती. याउलट घर का भेदी लंका ढाए हा अनुभव येत होता. एखाद्या सामान्य माणसाने किंवा पत्रकारनेही माहिती दिली तर ती माहिती जशीच्या तशी संबंधित संशयितांपर्यंत पोहचवली जात होती.
अलीकडच्या काळात मात्र एकूणच आयुक्तालयाचा कारभार पूर्ण सकारात्मक झाल्याचे पहायला मिळत असून जसा सेनापती तसे सैन्य हाही अनुभव येऊ लागला आहे. आयुक्तालयात जवळपास सर्वच प्रभारी नव्याने दाखल झाल्याचाही तो परिणाम असल्याच्या प्रतिक्रिया नाशिककर व्यक्त करतात.
याच इच्छाशक्तीचा आणखी एक प्रत्यय आला असून दिनांक १३/१०/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोअं अनिरूध्द येवले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जवळपास ५ लाखांचे एम डी पकडण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाला यश आले आहे.
फैसल उर्फ दाढी शफि शेख, वय-२६ वर्षे, रा.२१ श्रीनाथ कृपा, माहेश्वरी भवन समोर, आटिलरी सेंटर रोड, उपनगर, नाशिक, शिवान शफि शेख, वय-२५ वर्षे, रा.२१ श्रीनाथ कृपा, माहेश्वरी भवन समोर, आटिलरी सेंटर रोड, उपनगर, नाशिक,हिना शिबान शेख वय-२९ वर्षे, रा. उपनगर, नाशिक हे गाडी क्रमांक एम एच १५ सी एम ९७१० मधून अंदाजे ४,९७,५००/- रू. किंमतीचा ९९.५ ग्रॅम वजनाचा एम.डी (मॅफेड्रॉन) हा अंमली पदार्थ बेकायदेशिररित्या बाळगुन विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः चे कौशल्य वापरून त्यांना शिताफीने पकडले. एम डीचा मुददेमाल, स्कोडा गाडी क्रमांक एम एच १५ सी एम ९७१० अंदाने कि. २,००,०००/- रू किंमतीची व इतर असा एकुण ८,२२,५००/- रू किंमतीचा मुददेमाल जप्त करून, या तीन आरोपीविरूध्द नाशिक रोड पोलीस ठाणे येथे ५४१/२०२४ एन.डी.पी.एस. १९८५ चे कलम ८ (क), २२ (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहेत.
शिवान शफी शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असुन, त्याचेविरूध्द उपनगर पोलिस ठाण्यात ५५५/२०२१ भादवि. क ३०२, ३९५, ३९७, १४३, १४७, १४८, १४९, १२०ब, २०१ सह आर्म अॅक्ट ३/२५ सह मोक्का, ३२/२०१७ भादवि. क ३२६, ३२३, ५०४, १४३, १४७, १४८, १४९ सह मपोका क १३५ असे गुन्हे दाखल आहेत.
पोलिस आयुक्त संदिप कर्णिक गुन्हे शाखेचे पो. आयुक्त प्रशांत बच्छाव,सहा. पो. आयुक्त गुन्हे संदीप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे वपोनि सुशिला कोल्हे, सपोनि सचिन चौधरी, सपोनि विशाल पाटील, सपोउनि देवकिसन गायकर, सपोउनि संजय ताजणे, पोहवा भारत इंचाळे, पोहवा बळवंत कोल्हे, पोअं अनिरूध्द येवले, पोअं बाळासाहेब नांद्रे, पोअं योगेश सानप, पोअं चंद्रकांत बागडे, पोअं अविनाश फुलपगारे, मपोअं अर्चना भड सर्व नेम. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी ही कामगिरी पार पाडली.