नाशिक मध्ये रंगला श्वानांचा मेळावा गुगल आणि नीताचा सत्कार
नाशिक मध्ये रंगला श्वानांचा मेळावा
गुगल आणि नीताचा सत्कार
नाशिक -प्रतिनिधी
ग्रेप काऊंटी इको रिसॉर्ट व डॉ. दिग्विजय पाटील यांचे पेट परफेक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने श्र्वानांचा मेळाव्याचे म्हणजेच पॉ फेस्ट सीजन थ्री चे यशस्वी आयोजन करण्यात आले. यामध्ये विविध प्रजातीच्या 150 पेट्स ने सहभाग नोंदवला या मध्ये विविध प्रजातीचे पेट्स जसे की जर्मन शेफर्ड, डॉबरमॅन, पोमेलियन , कुडल्स,इटालियन मेस्टी, गोल्डन रिट्रायव्हर, लेब्राडोर यासारख्या असंख्य श्वानांनी सहभाग नोंदविला.
याचे वैशिष्ट्य म्हणजे पोलीस डॉग गुगल आणि नीता यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस श्वान पथकाचे कनिष्क कुंडे , अरुण चव्हाण, नितीन पगारे, गोपीनाथ कोल्हे उपस्थित होते.गुगलने यावेळी चोरांचा कसा मार्ग काढला जातो याचे छोटेसे प्रात्यक्षिक करून दाखवले.
या डॉग शोचे आकर्षण होते हर्षल वाघ यांच्या रागदा नावाचा बफेलो बुल की तो जवळपास 1000 किलोचा होता. यावेळी हर्षल वाघ यांनी त्याच्या आहाराविषयी व दैनंदिन व्यायामाविषयी लोकांना माहिती दिली . पॉ फेस्ट सीजन थ्रीचा महत्वाचा भाग होता श्वानांचा फॅशन शो यामध्ये डॉग ट्रेनिंग, बेस्ट ग्रुम डॉग, बेस्ट हेअर स्टाईल, बेस्ट पेहेनावा आदींचा सहभाग होता. विजेत्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना पारितोषिक देण्यात आले. याप्रसंगी पेट परफेक्टचे संचालक डॉ. दिग्विजय पाटील यांनी श्वानांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, श्वान कसा निवडावा कुठल्या प्रकारचे श्वान घरासाठी निवडावे व त्यांची संगोपन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले. हा पॉप फेस्ट सीजन 3 यशस्वी होण्यासाठी तेजस चव्हाण , अपेक्षा चक्रनारायण आदींनी विशेष सहकार्य केले.