क्राईम

राजवर्धन फाउंडेशनच्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, लाखोंच्या बक्षीसांची खैरात;  संगमनेरकर अनुभवणार प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार


राजवर्धन फाउंडेशनच्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ, लाखोंच्या बक्षीसांची खैरात ;

 

संगमनेरकर अनुभवणार प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार

संगमनेर प्रतिनिधी

युवा नेते राजवर्धन बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत याही वर्षी प्रीमियर लीग क्रिकेट होत असून 17 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी 2024 या काळात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे हा क्रिकेटचा थरार रंगणार असल्याची माहिती सिद्धार्थ थोरात व प्रशांत अभंग यांनी दिली आहे.

ग्रामीण व शहरी भागातील युवकांसाठी असलेल्या नामदार चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मागील वर्षी पुणे ,मुंबई सह राज्यभरातून अनेक क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षीही राज्यभरातील अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वा. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते होणार आहे.

Advertisement
  1. या स्पर्धेत प्रथम बक्षीस १ लाख २१ हजार १११ रुपये व चषक- के के थोरात यांच्याकडून द्वितीय बक्षीस डॉ विजयानंद खामकर व शतानंद खामकर यांच्याकडून ७१ हजार १११ व चषक ,तृतीय बक्षीस योगेश भालेराव यांच्याकडून ५१ हजार १११ आणि चतुर्थ बक्षीस जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्याकडून ४१ हजार १११ रुपये आणि चषक अशा स्वरूपात दिले जाणार आहे .त्याचप्रमाणे विजेता संघमालकांसाठी नवनाथ आरगडे ,सुभाष सांगळे व बाबासाहेब कांदळकर यांच्याकडून मोटरसायकल दिली जाणार आहे. उपविजेता संघ मालकास जिल्हा परिषद सदस्य आर. एम .कातोरे यांच्याकडून एलईडी स्क्रीन टीवी दिला जाणार आहे. तर तृतीय विजेत्या संघाला दीपक करंजकर यांच्याकडून सायकल दिली जाणार आहे. याचबरोबर या सर्व स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यांसह मॅन ऑफ द फायनलसह विविध पुरस्कार दिले जाणार आहेत .प्रत्येक संघातील खेळाडूंसाठी टी-शर्ट व स्पोर्ट किट दिली जाणार आहे .

या स्पर्धेत अनेक वैयक्तिक बक्षीस असून सोळा संघ सहभागी होणार आहेत. या 16 संघांमधून लिलावाद्वारे 250 खेळाडूंचा सहभाग निश्चित करण्यात आला आहे.

षटकार चौकारांच्या आतिषबाजीत होणा-या या स्पर्धेला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे ,सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, रणजीत सिंह देशमुख यांसह संगमनेर तालुक्यातील विविध पदाधिकारी व मान्यवर भेट देणार आहेत.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सौरभ कड़लग, संतोष शरमाळे, सोहेल पिंजारी, सनी अभंग, साहिल शेख, पांडुरंग खेमनर,अक्षय बांगर, बाबर शेख, नागेश आव्हाड परिश्रम घेत आहेत . या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा संगमनेर तालुक्यातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी लाभ घ्यावा असे आव्हान राजवर्धन युथ फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *