पावाच्या किमतीत वाढ अनिवार्य: २५ जानेवारीपासून १५-२० टक्के दरवाढ; नाशिक बेकरी असोसिएशनची घोषणा
पावाच्या किमतीत वाढ अनिवार्य: २५ जानेवारीपासून १५-२० टक्के दरवाढ;
नाशिक बेकरी असोसिएशनची घोषणा
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️👍☝️
मराठी संस्कृती जतन करा
……………………………………………………..,……………….
नाशिक प्रतिनिधी
नाशिक बेकरी असोसिएशनने पावाच्या किमतीत २५ जानेवारी २०२५ पासून १५ ते २० टक्के दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढती महागाई, कच्च्या मालाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, इंधन खर्च, आणि मजुरीत झालेली वाढ यामुळे बेकरी व्यवसाय अडचणीत सापडला आहे.
संघटनेने म्हटले आहे की, पाव उत्पादन करताना बेकरी उद्योजकांना प्रामाणिकपणे आणि प्रसंगी आर्थिक झळ सोसत व्यवसाय करावा लागत आहे. राज्यभरात इतरत्र पावाच्या किमतीत वाढ झाली असतानाही नाशिकमधील बेकरी उत्पादकांनी ग्राहकांसाठी जुने दर कायम ठेवले होते. मात्र, मैदा, तेल, इंधन, आणि मजुरीच्या किंमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ लक्षात घेऊन दरवाढ करणे आता अनिवार्य झाले आहे.
ग्राहकांना या परिस्थितीचे गांभीर्य समजून सहकार्य करावे, अशी नम्र विनंती नाशिक बेकरी असोसिएशनने केली आहे.
“पाव हा दैनंदिन जीवनातील हक्काचा आणि सर्वप्रिय पदार्थ आहे. आम्ही ग्राहकांचे हित लक्षात घेऊन पुढेही दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध राहू,” असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.