क्राईम

वंचित बहुजन माथाडी,ट्रान्सपोर्ट,कामगार युनियन जिल्हा कमिटी अध्यक्षपदी अविनाश शिंदे यांची नियुक्ती


वंचित बहुजन माथाडी,ट्रान्सपोर्ट,कामगार युनियन
जिल्हा कमिटी अध्यक्षपदी अविनाश शिंदे यांची नियुक्ती

नाशिक प्रतिनिधी –
वंचित बहुजन माथाडी.ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्या जिल्हा कमिटी अध्यक्षपदी अविनाश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे संस्थापक ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रदेश सरचिटणीस सुरेश मोहिते यांनी एका पत्रकाद्वारे याची घोषणा केली. यानंतर अविनाश शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा एकच वर्षाव सुरु झाला.
यानंतर अविनाश शिंदे यांनी युनियनची जिल्हा कार्यकारणी घोषित केली असून त्यात सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
युनियनची जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे. स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे यांची मार्गदर्शक पदी नियुक्ती झाली आहे तसेच सुनील साळवे,सिडको(महासचिव), सूरज गांगुर्डे,टाकळी( कोषाध्यक्ष),दामोदर पगारे,तुकाराम मोजाङ,जीवन जाधव( सर्व उपाध्यक्ष),आकाश सोनवणे व अतुल जाधव (सचिव),विशाल  हिवराळे, लखन डांगळे (संघटक),किरण मोरे (सहसचिव),करण दाभाडे,असिफ शेख (प्रसिद्धी प्रमुख).प्रमोद पाटील व संदेश सोनवणे(सदस्य). पदी निवड करण्यात आली आहे
जिल्ह्यातील माथाडी कामगार तसेच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,कामगारांना न्याय मिळवून देण्याचा आपण तसेच युनियनचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील राहतील,असे वंचित माथाडी कामगार बहुजन युनियनचे नूतन जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *