नाशिक जिल्हा बँक धनदांडग्याच्या वसुलीला ब्रेक? सर्व सामान्य ठेवीदार हालाहाल! आकाचे बोके मालामाल!!
नाशिक जिल्हा बँक धनदांडग्याच्या
वसुलीला ब्रेक?
सर्व सामान्य ठेवीदार हालाहाल!
आकाचे बोके मालामाल!!
विठेवाडी
नाशिक जिल्हा सहकारी बँकेत गेले, कित्येक वर्षापासून हेवी वेट बडे कर्जदार , कर्ज घेऊन मजा करत आहे.रिझर्व बँकचे
सर्व सगळे नियम व निकस धाब्यावर बसवुन ठराविक राजकीय लोकांना कर्ज वाटप झाले.त्यात वरिष्ठ स्तरावरून संबंधित कर्ज थकवणाऱ्यांना पाठिंबा दिला गेला,अशा बलाढ्य टॉप शंभरांकडे शेकडो कोटी थकबाकी आहे.वरिष्टांकडून वसुलीसाठी ब्रेक लावला आहे अशी कुजबूज आहे.परंतु वरिष्ठांनी नाण्याची दुसरी बाजू पण बघावी.बँकेचे हजारो ठेविदार हवालदिल आहेत.
ते त्यांच्या हक्काच्या ठेविंपासून वंचित आहेत,
ठेवीदारांची परिस्थिती हालाखीची आहे.काहींची आयुष्याची पंजी जिल्हा बँकेत अडकली.सर्वच ठेवीदार तनावा खाली आहेत.त्यातले काही व्याधीग्रस्त झाले, काही तर मयत सुद्धा झाले,काहींचे लग्न कार्य अडकले.
रिटायरमेंट नंतरची मोठी पुंजी अत्यंत विश्वासाने आपली बंक म्हणून जिल्हा बँकेत ठेवी रूपाने ठेवल्या आहेत.त्याला कारणही तसेच आहेत.गेले कित्येक वर्ष जनतेने बँकेचा सुवर्णकाळ बघितला आहे आणि असे काही अनपेक्षित घडेल याची कल्पना सामान्य ठेवीदारांना नव्हती.
वास्तविक चार हजार कोटी ठेवी असलेली एकमेव सहकारी बँक असा नाव लौकीक बँकेचा होता.
परंतु संचालक मंडळात काही महाठग घुसले, त्यांनी लुटीचे मार्ग शोधले, आणि बाकीच्यांनी त्यांना निमूटपणे सहमती दिली.हे सर्व करताना नीतिमत्ता बाजूला टांगुन ठेवली.
सामन्याच्या ठेवी लुटल्या गेल्या.आणि वरिष्ठांनी त्याकडे दबावाखाली दुर्लक्ष केले.ठेवीदारांची अवस्था काय आहे? या कडे वरिष्ठांनी लक्ष घालावे,कारण त्यांची काही चूक नाही.तुमचे पाप आहे ,ठेवीदार भोगत आहे.उदाहरणच द्यावयाचे झाल्यास करोणा काळात सटाणा तालुक्यातील एक मध्यम वर्गिय माध्यमिक शिक्षक असलेल्ं जोडपं करोनामुळे जिवघेण्या आजारात दवाखान्यात दाखल होत,निव्वृत्ती नंतरची सर्व रक्कम जिल्हा बँकत ठेव म्हणून ठेवली होती, दोन्हीही करोना महामारीमुळे कसंबसे दाखल झाले परंतु पैसा बँकेत ठेव म्हणून ठेवलेले असतानाही नोटा बंदीचे कारण पुढे करून त्यांना एक रुपयाही काढता आला नाही. परिणामी त्यातील कर्त्या पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाला ,संसार उघड्यावर पडला, अशी अनेक उदाहरणे देता येतील,
यातील प्रमुख संबधीत,सन्माननीय अर्थमंत्री अजित पवार यांचे जवळचे आहेत. सन्माननीय अजित दादांच्या हाती सत्ताकेंद्र आहे.त्यामुळे दादांनी लक्ष घातले तर प्रश्न सुटू शकतो.
अजित दादा संवेदनशील शासक आहेत.त्यांनी या टॉप शंभर थकबाकीदारांकडे विशेष लक्ष द्यावे आणि ती वसुली करून घ्यावी.
त्याचप्रमाणे बँकेला एक विशेष पॅकेज द्यावे.जे त्यांनी विधानसभेच्या इलेक्शन पूर्वी जनतेला आश्वासन दिले होते.त्यामुळे त्यांनी लक्ष घालणे जरुरीचे आहे.
बँक सुस्थितीत आणून पूनर्वैभव प्राप्त करून द्यावे ही सामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
कारण सर्व सामान्य गरीब शेतकऱ्यांना हक्काची कर्ज देणारी अर्थ वाहिनी ,अशी जिल्हा बँकेचीओळख आहे.त्यामुळे गेले काही वर्ष सामान्य गरीब शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.त्यामुळे त्यांना पुन्हा खासगी सावकाराकडे कर्जासाठी जावे लागत आहे.याचा परिणाम शेतकरी खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकत चालला आहे.शेतकरी आत्महत्या ह्या केवळ असे कर्ज आणि तणावाचे मुख्य कारण आहे याची जाणीव शासनकर्त्यानी ठेवावी ही अपेक्षा.
हे सर्व टॉपचे कर्जदार आर्थिक सुदृढ आहेत थोडा प्रयत्न करावा लागेल.
मागे विधानसभा इलेक्शन पुर्वी मोठी वसूली झाली हे उदाहरण सर्वा समोर आहे.
त्यामुळे अजित दादांनी आपला तिसरा डोळा उघडावा.नाशिक जिल्हा कायमच आपल्याबरोबर राहिला आहे.जिल्ह्यातील समस्यांकडे विशेष लक्ष द्यावे, प्रश्न मार्गी लावावे व तथाकथित आकांना सत्मार्गावर आणावे.
संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे
नाठाळाच्या पाठीत घाला काठी…..ही अपेक्षा व विनंती , सामान्य जनता या पेक्षा काय करू शकते…”दादा”.
कुबेर जाधव
समन्वयक
स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक