भयानक:विद्यार्थ्यांनीसह चौघा बालकांचे अपहपरण!
भयानक:विद्यार्थ्यांनीसह चौघा बालकांचे अपहपरण!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील माळेझाप परिसरात राहणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत तेथे चार मुलांना गाडीहून उतरुन पायी चालविल्याचे प्रत्येक सीसीटीव्हीत दिसते आहे. औंरंगपूर मार्गे विठे घाटापर्यंत चार मुलांचे अपहरण करण्यात आले. यात इयत्ता ३ री ची मुलगी आणि तिचे ३ लहान भाऊ आहेत. विठे घाटात मुले रडू लागल्याने काही व्यक्तींना संशय आला, अपहरणकर्ता पळून गेला असून वाटसरुंनी मुलांना माळेझापमध्ये मुलांना आई वडिलांच्या स्वाधीन केले. मुलांना पाहून आई वडिलांनी एकट टाहो फोडला. पुढील तपास होमगार्ड करीत आहे.