क्राईम

चोरीच्या रिक्षेला बनावट नंबर प्लेट! युनिट एकने एका इसमाच्या मुसक्या बांधून सहा रिक्षा केल्या जप्त 


चोरीच्या रिक्षेला बनावट नंबर प्लेट!

 

युनिट एकने एका इसमाच्या मुसक्या बांधून सहा रिक्षा केल्या जप्त 

 

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️

         मराठी संस्कृती जतन करा 

……………………………………………………………………………

नाशिक प्रतिनिधी

शहर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने एका चालाख संशयिताच्या मुसक्या बांधून चोरलेल्या तब्बल सहा रिक्षा ताब्यात घेतल्या आहेत.रामनाथ भाऊराव गोळेसर हा संशयित इसम कॅनडा कॉर्नर परिसरात राहत असून चोरी केलेल्या रिक्षेला बनावट नंबर प्लेट लावून तॊ रस्त्यावर चालवत असल्याची माहिती युनिट एकला मिळाली होती. त्या माहितीवरून शोध घेतला असता अशा सहा रिक्षा संशयिताच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या आहेत.

Advertisement

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हेशाखा युनिट क. १चे पोलीस अधिकारी व अंमलदार हे रिक्षा चोरीच्या गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेत असतांना पोहवा विशाल काठे यांना रिक्षा चोरी करणारा इसम भारतनगर परिसरामध्ये फिरत असल्याची गुप्त बातमी मिळाली.युनिट एकचे वपोनि मधुकर कड यांचे मार्गदर्शनात सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि वेतन श्रीवंत, पोहवा देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, पोअं विलास चारोस्कर, समाधान पवार यांचे पथक तयार करून त्यांनी रिक्षा चोरी करणाऱ्या इसमांचा शोध घेतला असता. रामनाथ भाउराव गोळेसर वय ४० वर्ष व्यवसाय रिक्षा चालक, रा. विराज कॉलनी, कॅनडा कॉर्नर, नाशिक हा त्याचे ताब्यातील चोरीच्या रिक्षेसह मिळुन आल्याने ती एक रिक्षा तात्काळ जप्त करण्यात आली. त्यानंतर त्यास अधिक विचारपुस करता त्याने चोरी केलेल्या आणखी ५ रिक्षा बाबत माहीती दिली, त्याचे ताब्यातुन एकुण ६,२५,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०६ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत . सदर रिक्षा चोरी बाबत मुंब्रा पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे । गुरनं ९५८/२०२४ भादविक ३७९ प्रमाणे, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ, ठाणे शहर येथे गुरनं. १०७८/२०२४ भा.न्या. सं कलम ३०३(२) प्रमाणे, कळवा पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गुरनं १३५०/२०२४ भा. न्या. सं कलम ३०३(२) प्रमाणे अशा तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. उर्वरित ०३ रिक्षा बाबत तपास चालु आहे. सदर आरोपीतास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, अंबरनाथ, ठाणे शहर येथे हजर करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त . संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त,गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव, गुन्हे सहा. पो. आ. संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउपनि चेतन श्रीवंत, पोहवा विशाल काठे, देविदास ठाकरे, रोहिदास लिलके, शरद सोनवणे, प्रदिप म्हसदे, संदिप भांड, नाझिमखान पठाण, धनंजय शिंन्दे, रविंद्र आढाव, उत्तम पवार, विशाल देवरे, पोअं विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, नितीन जगताप, समाधान पवार, सुकाम पवार, महिला पोअं शर्मिला कोकणी, मनिषा सरोदे, अनुजा येलवे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *