नासिक पुलिस कि आँखों मे धुल झोंकना बहुत आसान है! गुटखा एम डी माफियांकडून शिकवणी घ्या
नासिक पुलिस कि आँखों मे धुल झोंकना बहुत आसान है!
गुटखा एम डी माफियांकडून शिकवणी घ्या
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
…………………………………………………………………………….
प्रशांत हिरे / सुरगाणा
कानून के हात बहुत लंबे है, किंबहुना पुलिस की आँखोमे धूल झोकना आसान नही, असे डायलॉग गुन्हा घडून गेल्यानंतर घटना स्थळी पोहचणाऱ्या चित्रपटातील पोलिसांच्या तोंडी शोभतात. सिनेमा गृहात टाळ्या मिळवण्यापुरते ते सारे ठीक आहे, पण प्रत्यक्षात फिल्ड वर काम करणारे पोलिसांच्या बाबतीत काही गुन्ह्यांचा अपवाद सोडला तर हेच संवाद पोलिसांच्या जबाबदारीची थट्टा करतांना दिसतात. नाशिक शहर आणि पोलिस देखील त्याला अपवाद नाहीत. त्यातही जिल्हा पोलिसांची जबाबदारी काकणभर अधिक आहे.
शहर पोलिस असू देत नाहीतर ग्रामीण बहुतांश गुन्ह्यांची उकल करण्यात शहर आणि ग्रामीण पोलिस अव्वल आहेत. मात्र शहर आणि जिल्ह्याला विळखा घातलेल्या एम डी गुटखा, कुत्ता गोळी अशा अमली पदार्थांचा खुला व्यापार करणाऱ्या माफियांच्या मुसक्या बांधतांना शहर आणि ग्रामीण पोलिस दलाचे हात का थरथरतात याचे गूढ न उकलण्याइतके कठीण नक्कीच नाही. त्याच अर्थाने नासिक पुलिस की आंखोमे धूल झोकना बहुत आसान है, हा नवा डायलॉग जिल्ह्यात आणि सर्रास कानावर पडतो. विशेषता गुटखा आणि एम डी माफियांना ही कला चांगलीच अंगवळणी पडली आहे.
जिल्ह्यात रोज कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची तर शहरात एम डी विक्री होतेय. त्यात सर्वात आघाडीवर विमल नामक गुटखा आहे.सदरचा गुटखा गुजरात मधून महाराष्ट्रात येतोच कसा हा यक्ष प्रश्न विचारला जातोय. “कानुन के हाथ बहुत लंबे होते है।” असे आम्ही ऐकले आहे. परंतु, जेथे हप्ते दिले जातात तेथे तेच लंबे- लंबे हात आखडलेले पाहिले आहेत . अशा परिस्थितीत खऱ्या अर्थाने गुटखा बंदी, एम डी बंदी होईल कशी? “पुलिस कि आँखों मे धुल झोंकना आसान नही होता” हा डायलॉग बर्याचदा ऐकलाय. किती छान डायलॉग आहे? मग राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सिमा ओलांडून गुटखा येतोच कसा? सरकारला जनतेची खूप- खूप काळजी आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन या स्वतंत्र विभागाची निर्मिती केली गेली. जनतेला उत्तम वस्तू खाण्यास देणे, व वाईट वस्तू विक्री करण्यास प्रतिबंध करणे,कारवाई करणेची जबाबदारी देखील सोपवली. परंतु, हप्तेखोरीमुळे काही अधिकारी नैतिकता गमावून बसले आहेत.सन्माननीय अपवाद ठरणारे अधिकारी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच आहेत. परिणामी कायदा कुचकामी ठरु लागला आहे.गुटखा सेवनाने कर्करोग अर्थात कॅन्सर होतो,तर एम डीच्या सेवनाने मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य दोन्हीही ढासळते ही बाब सर्वश्रुत आहे.
गुटखा सेवनाने कॅन्सर होतो. असा संदेश पुडीवर लिहीलेला असतो. ही गंभीर बाब सरकार व प्रशासनाला देखील ज्ञात आहे. असे असताना काही गुटखा माफियांची ठराविक राजकीय बगळ्यांशी अर्थपूर्ण मैत्री असल्याने कायदा धाब्यावर बसवला जातॊ यात नावीन्य काहीच नाही. हप्ते द्या आणि एम डी, गुटखा विका असा अलिखित संकेतच झाला आहे.ज्या काही कारवाया सुरु आहेत तॊ केवळ फार्स आहे. दहा वीस टक्के माल रेकॉर्डवर घेऊन उर्वरित मुद्देमाल संगणमताने रफा दफा केला जातो हे एव्हाना सर्वांचं समजले आहे.
चौकट
*भले मोठ मोठे गोडाऊन! पोलीसांना दिसत नसतील ठासून ?*
गुटख्याच्या संदर्भात पोलीसांनी कितीही मांजराची भूमिका घेऊन, डोळे मिटून दूध पिण्याची किमया केली. तरीही जनतेपासून ते लपून राहत नाही. या गुटखा सम्राटाने पैसे हातात आल्यानंतर हा धंदा आणखी वाढीस लागावा ! या उद्देशाने घरी आणि शेतात (अर्थात पैसे आल्यानंतर घेतलेल्या) बक्क भलेमोठे गुटखा साठवण्यासाठी गोडाऊन बनवले आहे. आता हे गोडाऊन पोलीसांना दिसत नसतील का? की ते दिसून देखील ते मूग गिळून गप्प बसत असतील! तसे असेल तर ते का? याबद्दल हि जनतेमध्ये उलट-सुलट चर्चा आहे. प्रामाणिकपणे पोलीसांनी कर्तव्य बजावून अशा गोडाऊनची कसून तपासणी केल्यास, या धंद्यातील मुरलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे पोलीसांना शक्य होऊ शकेल! जर त्यांची मानसिकता असेल तर!!
वारांगनेला मनिहार!
खरेतर नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रमुख हे ‘मिस्टर क्लीन’ म्हणून ओळखले जातात. अनेक अधिकारी आणि कर्मचारी देखील ‘साहेब देव माणूस आहे,.’ असे राजरोस पणे सांगतात. मग हा वरपर्यंत जाणारा हप्ता नेमका कोणत्या थरापर्यंत जातो? हे कळायला मार्ग नाही. नाशिक शहरात येणारे अमली पदार्थ जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांची हद्द ओलांडून येतात कसे? या प्रश्नाचे उत्तर देण्याचे उत्तर दायित्व मि. क्लीन कुटुंब प्रमुखांचे नाही का?कष्ट करणाऱ्यांनी करतच रहावे आणि या हुजरेगीरी, दलाली करणाऱ्यांनी आपल्या तुंबड्या भरतच रहावे ! हा प्रकार पाहिल्यास, ‘पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार!असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल !