भरधाव धावणाऱ्या डंपरखाली चिरडून महिलेसह म्हशीचा मृत्यू ;घटना स्थळी ग्रामस्थ संतप्त अभोणा हद्दीत तणाव निवळण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना यश
भरधाव धावणाऱ्या डंपरखाली चिरडून महिलेसह म्हशीचा मृत्यू ;घटना स्थळी ग्रामस्थ संतप्त
अभोणा हद्दीत तणाव निवळण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना यश
☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
मराठी संस्कृती जतन करा
चेतन हिरे अभोणा
आज दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अभोणा नांदुरी रस्त्यावरील कुंडाणे येथील मंदिराच्या समोर असलेल्या फरशीजवळ एका भरधाव डंपरने महिला व म्हशीला चिरडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघाता दरम्यान संतप्त नागरिक आणि पोलिसांमध्ये किरकोळ हमरी तुमरी झाल्याचे वृत्त आहे.
या धक्कादायक अपघाताबाबत प्राथमिक माहिती अशी की, नांदुरी कडून आभोण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या डंपरने म्हशीला उडवल्यानंतर रस्त्याच्या कडेला एक महिला उभी असताना तिला चिरडले आहे. या भीषण अपघातात महिला व म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. डंपर देखील रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे. तसेच या डंपरला पुढील व मागील बाजूने कोणतीही नंबर प्लेट आढळून येत नाही. या अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच कुंडाणे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अभोना पोलिसांना देखील या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. या भीषण अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याबाबत परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या भीषण अपघाताबाबत कुंडाणे ग्रामस्थांनी व महिलेच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव विठाबाई किसनराव ढुमसे असे असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.मयत, विठाबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अभोणा ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आला असून वाहन चालक यास अभोणा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यातआला असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असून, मिरखेलकर, किरणकुमार सुर्यवंशी अभोणा पोलीस स्टेशनला उपस्थित आहेत.