नांदुरशिंगोटे चास परिसरातील दुकाने फोडनारे चोरटे गजा आड ;
नांदुरशिंगोटे चास परिसरातील दुकाने फोडनारे चोरटे गजा आड ;
वावी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडुन 12 तासांचे आत जेरबंद
सिन्नर प्रतिनिधी
वावी पोलीस स्टेशन हददीतील नांदूरशिंगोटे या गावातील नांदूरशिंगोटे ते चास जाणारे रोडलगत असलेले सुदाम त्रंबक आव्हाड रा. नांदूरशिंगोटे ता सिन्नर यांचे स्वीटी ईलेक्ट्रॉनिक दुकानात दि. 23/04/2024 रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी शटर उचकाउन दुकानातील नविन मोबाईल, स्मार्ट वॉच, रोख रक्कम असा एकुन 2,48,000/- रू चा मुददेमाल चोरून नेला होता तसेच चास ता सिन्नर येथील 01 फोटो स्टुडीयो व 01 चप्पल विकीचे दुकान फोडुन 01 LCD टीव्ही, व काही चप्पल जोड चोरी करून नेलेले होते. नांदूरशिंगोटे येथील स्वीटी ईलेक्ट्रॉनिक दुकानातील CCTV कॅमे-यात चोरट्यांची छबी कैद झालेली होती.
सदर गुन्हयाचा तपास वावी पोलीस स्टेशन कडील पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संमातर तपास करीत असतांना वावी पोलीस स्टेशन चे सपोनि / संदेश पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा ईगतपुरी येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आदील पठाण याने त्याचे साथीदारांसह केलेली असुन ते सध्या अकोला जि अहमदनगर येथे बसस्थानक परिसरात चोरी केलेल्या मोबाईल विकी करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याप्रमाणे तपासपथकांनी तात्काळ अकोला बसस्थानक परिसरात जावुन अकोला पोलीस स्टेशनचे अंमलदार महेश आहेर यांचे मदतिने संशयित चोरट्यांचा शोध घेतला असता ते एका रिक्षात बसलेले दिसुन आले व तेव्हा पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेतले व त्यांचेकडेस चौकशी केली असता त्यांनी दि.23/04/2024 चे रात्री नांदूरशिंगोटे, चास येथील दुकाने फोडुन चोरी केल्याचे सांगितले व चोरीस केलेला मुददेमाल हा ऑटो रिक्षाचे डीक्कीत लपवलेला असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेले आरोपी वसिम सलीम शेख, वय-40 वर्षे, कोळीवाडा, ओल्डबाय शाळेजवळ, हयात कॉम्प्लेक्स, कल्याण,रियाज अहमद शेख, वय-33 रा. कल्याण वेस्ट, वलीपिर रोड, मेमन मस्जिद जवळ यांचेकडुन ऑटोरिक्षा क एमएच 05 डीक्यु 5293 हीचे डीक्कीत व पुढील शिटचे खाली लपवुन ठेवलेले चोरीचे मोबाईल, स्मार्ट वॉच, चप्पल जोड तसेच LCD टीव्ही व गुन्हा करतांना वापरलेली बजाज ऑटोरिक्षा क एमएच 05 डीक्यु 5293 असा एकुन 2,64,500/- रू मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
नाशिक ग्रामिण जिल्हा पोलीस अधीक्षक विकम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर व उपविभागिय पोलीस अधिकारी निफाड निलेश पालवे यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि / संदेश पवार, पोउपनिरी/देविदास लाड, वावी पोलीस स्टेशन, पोलीस अंमलदार/विनोद टिळे, प्रदीप बहीरम, हेमंत गिलबिले नेम. स्थानिक गुन्हे शाखा, वावी पोस्टेचे अंमलदार हेमंत कदम, किरण पवार यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणला.