ताज्या घडामोडी

प्रतीक्षा गडाख हिची तलाठी पदी निवडीबद्दल हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी केला सत्कार


प्रतीक्षा गडाख हिची तलाठी पदी निवडीबद्दल हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी केला सत्कार

संगमनेर (नितीनचंद्र भालेराव) –

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतलेल्या सरळ सेवा भारती परीक्षेत हिवरगाव पावसा गावची सुकन्या प्रतीक्षा गडाख हिची तलाठी पदी निवड झाली. प्रतीक्षा गडाख हिची तलाठी पदी निवड झाल्याबद्दल हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी भाजापा कार्यालयात सत्कार केला.यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष गणेश दवंगे,पी.आय.नारायण पावसे,सचिन सस्कर,दिगंबर पावसे, सुरेश पावसे,दत्तू शेटे,विलास पावसे,संतोष पावसे,प्रकाश पावसे,कैलास दिवटे,अशोक गोफणे,दत्तू पावसे,अनंता पावसे,परसराम पावसे,अर्जुन गडाख,नाना पावसे,चंद्रकांत भालेराव,शरद पावसे आदी ग्रामस्त उपस्थित होते.

Advertisement

हिवरगाव पावसा येथील रहिवासी जि.प.शाळा टाहकारी,ता.अकोले येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले आप्पासाहेब सदाशिव गडाख यांच्या सुकन्या कु. प्रतीक्षा गडाख हिने बी.एसी.अग्री.चे शिक्षण डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली पूर्ण केले.त्यानंतर एम.एससी.अग्री पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोले येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. प्रतीक्षा गडाख हिने सन २०२० पासून स्पर्धा पारक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.आय.बी.पी.एस.,एम.पी.एस.सी.स्पर्धा परीक्षा दिल्या.मागील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने घेतलेल्या सरळ सेवा भारती परीक्षेत उत्तीर्ण झाली.तिची ग्राम महसूल अधिकारी तलाठी पदी निवड झाली.या परीक्षे करिता अहोरात्र मेहनत केली.स्वतःच घरी स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि उत्कृष्ट असे यश संपादन केले.
प्रतीक्षा गडाख हिची आई संगीता गडाख या चंदनेश्वर माध्यमिक विद्यालय,चंदनापुरी येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.आजोबा सदाशिव सोपान गडाख हे प्रगतशील शेतकरी आहेत.मोठा भाऊ अक्षय गडाख शेती बरोबर हार्डवेअर व्यावसायिक आहे.प्रतीक्षा गडाख हिचे कुटूंब उच्च शिक्षित,सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. प्रतीक्षा गडाख हिची तलाठी पदी निवड झाल्या बद्दल हिवरगाव पावसा ग्रामस्तांनी भाजापा कार्यालयात सत्कार केला आणि तिला भावी कार्य साठी शुभेच्छा दिल्या.तिच्या निवड झाल्यामुळे हिवरगाव पावसा पंचक्रोशीतील नागरिक समाधान व्यक्त करत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *