ताज्या घडामोडीसामाजिक

उद्योजिका नंदा पवार यांच्यासह कर्तृत्ववान महिलांचा सन्मान,कला सम्राज्ञी पवळा कलामंचचा पुढाकार


बचत गट चळवळीमुळे महिला आत्मनिर्भर,आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या – जयश्री थोरात

उद्योजिका नंदा पवार यांच्यासह कर्तृत्ववान महिलांचा सन्मान,कला सम्राज्ञी पवळा कलामंचचा पुढाकार

संगमनेर : तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे कृष्णली महिला ग्रामसंघ कार्यालयाचे उद्घाटन तसेच महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तसचे जागतिक महिला दिनानिमित्त आद्यनृत्यागणं नामचंद पवळा भालेराव हिवारगावकर याच्या स्मरणार्थ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्री शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण गटविकास अधिकारी अनिल नागणे आणि एकवीरा फौंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.खराडी येथील महिला उद्योजिका नंदा पवार यांच्यासह कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.यावेळी राजहंस दुध संघाचे संचालक डॉ.प्रमोद पावसे,सरपंच सुभाष गडाख,ग्रामसेवक हरिष गडाख,सचिव प्रा.नितीनचंद्र भालेराव,डॉ.विजय पावसे,डॉ.संदीप पावसे,रोहिणी भालेराव,तालुका अभियान व्यवस्थापक निलेश कोकाटे,रवींद्र खलाटे,अभिजीत गंभिरे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थितीत होते.

Advertisement

महिला सन्मान सोहळा व हळदी कुंकवाचा कर्यक्रमास मार्गदर्शन करताना जयश्री थोरात म्हणाल्या महिला घरासाठी खूप कष्ट घेतात.दिवसरात्र कुटुंबासाठीच्या प्रगतीकरिता मेहनत करतात.परंतु महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्या आजारांनी व्याधीग्रस्त होतात.महिला शेतात कष्ट करतात,दुध व्यवसायात त्यांचा मोठा सहभाग असतो.परंतु पैसा मात्र घरातील पुरुषांच्या हाती असल्यामुळे पैशांसाठी पुरुषांवर अवलंबून राहावे लागते.बचत गट चळवळी मुळे महिला आत्मनिर्भर बनत आहेत,बचत गटांमार्फत उद्योग,व्यवसाय करत आर्थिक प्रगती करत आहे. स्वतःच कुटुंबाचे आर्थिक निर्णय घेत आहे. ग्रामीण भागात बचत गट चळवळी मुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या आहेत हि समाधानकारक बाब आहे.
संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि,हिवरगाव पावसा येथील महिला बचत गटांची उलाढाल करोडो रुपयांची आहे.अहमदनगर जिल्ह्यात आदर्श असे काम पावसा येथे महिला बचत गटांच्या माध्यमातून उभे राहिले आहे.येथील महिला खावा उद्योग,मका भरडा प्रक्रिया उद्योग,जेवणाच्या ऑर्डर पुरविणे,डिजिटल फोटोग्राफी व्यवसाय इ.अनेक नाविन्यपूर्ण व्यवसाय बचत गटाच्या मध्यमातून करत आहेत.त्यामुळे महिलांची परिणामी कुटुंबाची आर्थिक प्रगती होत आहे.जास्तीत जास्त महिलांनी बचत गट चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन अनिल नागणे यांनी केले आहे.
समजतील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केल्यास इतर महिलांसमोर प्रेरणा,आदर्श उभा राहतो.कलेच्या क्षेत्रात स्टेजवर प्रथम नृत्य सदर करणाऱ्या आद्यनृत्यागणं नामचंद पवळा भालेराव हिवारगावकर यांचे हिवरगाव पावसा हे जन्म गाव आहे.त्यांच्या कला क्षेत्रातील भरीव योगादानामुळे महाराष्ट्राच्या लावणी व तमाशा या लोककलेला मोठ्या उंचीवर पोहचवले आहे.अशा महान कलावंत पवळा भालेराव हिवारगावकर याच्या स्मरणार्थ जागतिक महिला दिनानिमित्त कला सम्राज्ञी पवळा कलामंच, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, राजर्षी शाहु विचारमंच आणि ग्रामपंचायत हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान महिलांचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्री शक्ती गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केले.खराडी ता.संगमनेर येथील महिला उद्योजिका नंदा विलास पवार यांच्या कंपनीचे स्वच्छता संबधित उत्पादनांची विक्री कातर,अमेरिका येथे केली जाते अशा कर्तृत्ववान महिला उद्योजिका नंदा विलास पवार यांच्या सह उपसरपंच सुजाता दवंगे यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्री शक्ती गौरव पुरस्काराने गटविकास अधिकारी अनिल नागणे आणि एकवीरा फौंडेशन च्या अध्यक्ष जयश्री थोरात, डॉ. प्रमोद पावसे यांच्या हस्ते सन्मानित केले.

तसेच कृष्णली ग्राम संघाच्या अध्यक्षा गौरी पावसे,अंगणवाडी सेविका मायाताई बागुल,संजीवनी गडाख,शीला पावसे,सुवर्ण पावसे,अनिता दिवटे यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्री शक्ती गौरव सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णली ग्राम संघाच्या पदाधिकारी,सदस्या, ग्रामपंचायत हिवरगाव पावसा,बचत गटातील महिला, ग्रामस्तांनी सहकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *