ताज्या घडामोडी

भाजप जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते ठाणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 


भाजप जिल्हा अध्यक्षांच्या हस्ते ठाणगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ 

 

सिन्नर प्रतिनिधी

भाजपचे जिल्हा अध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्या हस्ते ठाणगाव येथेविविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर केळी ठणगाव रस्त्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. केळी ठाणगाव रस्ता दिवाळीच्या आत पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करताना आम्ही फक्त आश्वासन देणार नाही तर काम पूर्ण करून दाखवू असा शब्द भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी यावेळी दिला.

Advertisement

 

यावेळी भारतीय जनता पार्टी ठाणगावच्या वतीने बाईक रॅलीही काढण्यात आली, यावेळी “जय जवान,जय किसान, जय श्रीराम”, भारतीय जनता पार्टी विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी भाई जैसा हो, अशा घोषणा देण्यात आल्या. केळी ठाणगाव रस्त्याचे उद्घाटन प्रसंगी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांच्या समवेत भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र उपाध्यक्ष व भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मुकुंद काकड, यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन व नारळ फोडण्यात आले व कुदळी मारण्यात आली,

यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे, जिल्हा सरचिटणीस शरद कासार, जिल्हा चिटणीस आदित्य केळकर, तालुका अध्यक्ष बहिरू दळवी, तालुका सरचिटणीस संघटना रामदास भोर, ठाणगाव उपसरपंच विलास मोरे, तालुका भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष मोहन आव्हाड, युवा नेते प्रतीक शिंदे, बाळासाहेब काकड, भाऊसाहेब काकड, राजेंद्र काकड, प्रतीक शिंदे के एल शिंदे, बाळासाहेब शिंदे,यज्ञेश काळे, वसंत आव्हाड, राजेंद्र कांगणे, वसंत काकड, सुनील जोशी, राजेंद्र मंडळे सखाराम बर्डे, अशोक बर्डे, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *