लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी चा पदग्रहण सोहळा
लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटी चा पदग्रहण सोहळा
_____________________
सिन्नर..
येथील लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटि चा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. सन २०२४/२५ साठी अध्यक्ष नितीन पटेल सेक्रेटरी स्वप्नील धूत व खजिनदार किशोर लहामगे प्रथम उपाध्यक्षy विकास महाजन यांच्या सह सर्व पदाधिकारी यांना शपथ देण्यात आली.
हॉटेल पंचवटी येथे झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर शपथ प्रदान अधिकारी राज भाई मुछाल नूतन सभासद यांना शपथ प्रदान करणारे अधिकारी राजेश कोठावदे झोन चेअरपर्सन अपर्णा क्षत्रिय तसेच चार्टर प्रेसिडेंट सर्जेराव देशमुख सविता देशमुख अश्विनी धूत उपस्थित होते..
दया पटेल यांनी ध्वजवंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.डॉ महावीर खीवंसरा यांनी राज मुछाल तर विकास महाजन यांनी राजेश कोठावदे यांचा परिचय करुन दिला सर्जेराव देशमुख यांनी मनोगत व्यक्त करतांना मागील कार्याचा आढावा घेतला.
क्लबचे हे सात वे वर्ष असून समाजोपयोगी उपक्रमा द्वारे आपल्या कार्याचा आलेख कायम उंचावत नेला आहे.माझ्या काळात असाच सेवाकर्याचा आलेख उंचावत ठेवण्याची ग्वाही अध्यक्ष नितीन पटेल यांनी दिली.त्या नंतर मुछाल यांनी सर्व पदाधिकारी व सभासद यांना शपथ दिली. व त्यांची क्लब साठी असलेली जबाबदारी समजाऊन सांगताना क्लबचे अंदाज पत्रक व नियोजन कसे करावे, समाजातील दानशूर व्यक्तींकडून निधी उपलब्ध करतांना कोणत्या उपाय योजना कराव्या याची सविस्तर माहिती पदाधिकाऱ्यांना करून दिली .कोठवदे यांनी सागर व रश्मिता हारखानी, हिमांशू व रोशनी पटेल , रश्मी मारवाडी या नवीन सभासदांना शपथ देऊन क्लब विषयी माहिती दिली.या वेळी क्लबच्या वतीने पुणे येथील पूरग्रस्तांना मदत राज भाई मुछाल यांच्या कडे सपुर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दया पटेल सोनल कटारिया डॉ हेमांगी सानप यांनी केले.या प्रसंगी महेंद्र तारगे , डॉ प्राणेश सानप वसंत पटेल मिलिंद कपोते पार्थ पटेल करण कटारिया वनिता पटेल वैशाली तारगे भारती लहामगे निता पटेल डिंपल चोथवे सीमा खीवंसरा रक्षा पटेल माधुरी महाजन तेजश्री चकोर राहुल चोथवे सुनील चकोर विनायक पवार या सदस्य उपस्थित होते.