महिला सुरक्षा शाखेतच ‘फ्रि-स्टाईल’! सासरच्या मंडळीस मारहाण
महिला सुरक्षा शाखेतच ‘फ्रि-स्टाईल’!
सासरच्या मंडळीस मारहाण
नाशिक प्रतिनिधी
पती-पत्नीतील भांडणाची तक्रार पोलिस ठाण्यात येते. त्यासंदर्भात गुन्हा दाखल होण्यापूर्वी महिला सुरक्षा शाखेमार्फत समुपदेशन केले जाते. मात्र याच शाखेत आलेल्या पतीला संशयित पत्नीने मारून दुखापत केली तर नातलगांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा स्वप्निल कुऱ्हे , रवींद्र ढवण, संगीता रवींद्र ढवण अशी संशयितांची नावे आहेत. स्वप्निल रमेश कुऱ्हे (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा परिसर, संभाजीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, पत्नी निशा व त्यांच्यात वाद झाला असून, त्यासंदर्भात २५ जून रोजी त्यांना समुपदेशनासाठी शरणपूर पोलीस चौकी येथील महिला सुरक्षा विशेष शाखेत बोलाविले होते. त्यावेळी स्वप्निल हा त्याच्या आई-वडिलांसह तर, संशयित पत्नी व दोघे आलेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिला सुरक्षा शाखेच्य आवारातच संशयित पत्नी निशा हिने पती स्वप्निल याच्या डोक्यात दगड मारून दुखापत केली तर, संशयित रवींद्र ढवण याने स्वप्निलच्या आईला व वडलांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली तर संशयित संशयित संगीत ढवण हिनेही शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात संशयित पत्नीसह तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.