*संत निवृत्तीनाथ महाराजांचा दातली सिन्नर येथे रिंगण सोहळा,*
*”सोन्याचा दिवस आज अमृते पाहिला”*
*टाळ मृदूंगे संगे रिंगण रंगला*दातली येथे संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे अभूतपूर्व रिंगण,
सिन्नर प्रतिनिधी :
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहोळ्याचे दातली तालुका सिन्नर येथे अभूतपूर्व स्वागत झाले. संत निवृत्तीनाथ महाराजांचे पालखीवर जेसीबी ने फुले उधळून स्वागत करण्यात आले,त्यानंतर भगव्या पताका, टाळ मृदूंग धारी,तुळशी वृंदावण घेतलेल्या महिलांच्या तसेच आश्वाच्या रूपाने दातलीचा रिंगण सोहोळा अपूर्व पणे झाला.
दातली येथील शेतकरी सुमन शेळके व कैलास शेळके यांनी रिंगण सोहोल्यास जागा उपलब्ध करुण दिली तर संजय तांबे यांनी रिंगण सोहोळ्यासाठी अश्व उपलब्ध करुन दिले,
यावेळी दातली ग्रामस्थ व परिसरातील वारकरी वैष्णवं सिन्नर प्रशासनाने दातली येथील रिंगन सोहोळ्याचे नियोजन मोठ्या जोमाने केले होते,
यावेळी महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवीतकर,महा मंडलेश्वर शनेश्वर महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थांनचे माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड, प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे माजी पालखी प्रमुख पुंडलिकराव थेटे,महंत संपतरावं धोंडगे, हभप पंडित महाराज कोल्हे,,हभप तुकाराम धात्रक,आमदार बाळासाहेब सानप,कोंडाजी मामा आव्हाड, उदय सांगळे, बाळासाहेब थोरे, महेश गडाख,नितीन धोगडे,
दातलीच्या सरपंच सीमाताई चांदोरे हेमंत भाबड, अध्यक्ष कांचन ताई जगताप, पालखी प्रमुख नारायण मुठाळ, सचिव अमर ठोंबरे, माजी अध्यक्ष निलेश गाढवे, सोमनाथ घोटेकर, वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष राम खुर्दळ,व संस्थांनचे सर्व विश्वस्त यासह असंख्य वारकरी उपस्थित होते.Advertisementजिल्ह्यातील अनेक जेष्ठ कीर्तनकार यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. यावेळी हभप एकनाथ महाराज गोळेकर यांनी सांगितले की संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहोळ्यात विश्वस्त यांचा सहभाग निरंतर पाहिजे, त्यांनी आपला सहभाग पालखीत नियमित द्यावा,यावेळी माजी अध्यक्ष त्र्यंबकराव गायकवाड यांनी सांगितले की आम्ही संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर जीर्णोद्धार पालखी सोहोळा यात निरंतर सहभागी असायचो ही विश्वस्तांची जबाबदारी आहे.
क्षणचित्रे :
हनुमानचे रूप घेऊन वारकरी रिंगण सोहोळ्यात सहभागी,
छोटे मुलं महिलांचा पालखीत उत्फूर्त सहभाग
रिंगण सोहोळ्यात भगवे पताका घेऊन वारकरी धावत होते,
अश्व धावत होते अन वारकरी राम कृष्न हरी असा जयघोष सुरु होता.
दरम्यान यावेळी प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी सांगितले की येत्या ३ जुलै ला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहोळा नगर जिल्ह्यात येत आहे, यावेळी
जिल्हा प्रशासनाने पालखी स्वागत व संत निवृत्तीनाथांचा समाधी सोहोळ्यासाठी पूर्ण सहकार्य करावे, ही सेवा घडावी म्हणून ही प्रशासना वतीने नियोजन केले आहे.
अभूतपूर्व अलौकिक अनुभव
टाळ-मृदंगाचा गजर अन् विठ्ठलाचे अभंग आळवीत पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या पावलांना एका अनोख्या चैतन्याचे बळ मिळत असते. पण, सलग वाट चालत असताना वारीला काहीतरी वेगळेपण मिळाले, तर हे बळ द्विगुणीत होत असते.