*वैकुंठवासी जनाबाई कचरू मुंगसे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ व दशक्रिया निमित्त वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसविण्याचा मुंगसे परिवाराचा अनोखा कार्यक्रम*
*वैकुंठवासी जनाबाई कचरू मुंगसे यांच्या स्मृतीप्रत्यर्थ व दशक्रिया निमित्त वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसविण्याचा मुंगसे परिवाराचा अनोखा कार्यक्रम*
सिन्नर प्रतिनिधी
संत जनाबाईंच्या परंपरेतील कै. श्रीमती जनाबाईंना देवाधर्माचं आणि निसर्गाचं सतत वेड . त्यामुळे मुंगसे परिवाराने त्यांची स्मृती जतन करण्यासाठी *वृक्षवल्ली आम्हा सोयरे* या संत तुकारामांच्या उक्ती प्रमाणे देवकौठे तालुका संगमनेर येथील देवी मंदिर परिसर व नदीच्या काठी वृक्षारोपण करून व वृक्ष संवर्धन करण्यासाठी 50 संरक्षकजाळ्या बसवून एक अनोखा कार्यक्रम पार पाडला.
यावेळेस मुंगसे परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्रीराम गबाजी मुंगसे( गुरुजी) प्राध्यापक राजाराम मुंगसे ,दिनकर कचरू मुंगसे, मा. चेअरमन ज्ञानेश्वर श्रीराम मुंगसे, मा. चेअरमन राजेंद्रजी कहांडळ, बापूशेठ शेवकर, प्रा. नामदेव कहांडळ,रोहिदास मुंगसे ,विजय मुंगसे ,अभिमन्यू मुंगसे ,ऋषिकेश मुंगसे ,आशाबाई मुंगसे, बिजलाबाई मुंगसे, प्रतीक्षा मुंगसे व आर जी पी कहांडळ विद्यालयाचे मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करून मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.



